पाटणमध्ये उद्या बळीराजाचे भीक मांगो आंदोलन

पाटणमध्ये उद्या बळीराजाचे भीक मांगो आंदोलन
बळीराजा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला

पाटणमधील बाधितांना 108 रुग्णवाहिका, व्हेंन्टीलेटर, ऑक्सीजन आदी.सुविधा मिळण्यासाठी बळीराजाचा पवित्रा   

कराड/प्रतिनिधी :

       पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु, अशा परिस्थितीत पाटणमध्ये कोरोना बाधितांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी कराडला नेले असता पाटण तालुक्यातील रुग्ण असल्याने त्यांना कराडमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नाही. येथील रुग्णांना सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना भीक मागून सरकारला आर्थिक मदत करणार असल्याची माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख व सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
          सदर आंदोलनास गुरूवारी 18 रोजी विहे ता. पाटण येथून सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर  येथील मल्हारपेठ, नवरस्ता व पाटण याठिकाणी भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. यामधून भीक म्हणून मिळालेले पैसे पाटणच्या तहसिलदारांमार्फत सरकारला देण्यात येणार असल्याचा उल्लेखही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.