ना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

रामराजे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे साधू सन्याशी नाही,सुरवडी येथील पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह  यांची घणाघाती टीका

ना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

रामराजे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे साधू सन्याशी नाही,सुरवडी येथील पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह  यांची घणाघाती टीका


फलटण/अनमोल जगताप


      मला षटकार मारायची सवय असल्यामुळे मी सत्तेत आल्या आल्या पहिल्याच  षटकारा मध्ये  कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे प्रश्न सोडवला, दुसऱ्या षटकारात फलटणला दुसरी एमआयडिसी मंजूर केली, फलटण - आदर्की व फलटण म्हसवड रस्त्यांची कामे मार्गी लावली तसेच नीरा-देवघरचे पळवलेले पाणी परत आणण्याचे काम केले यासह जवळपास 76 कोटींचा निधी मतदारसंघातील तसेच फलटण तालुक्यासह मतदार संघाच्या विकास कामांसाठी आणलेला आहे. त्याची मंजुरी पत्र माझ्याकडे आहेत आणि रामराजे विचारतात खासदारांनी काय आणले ? रेल्वे, एमआयडीसी, रस्ते, नीरा देवघर पाणी ही प्रमुख कामे सोडून केलेल्या 76 कोटीच्या कामांमध्ये रस्ते, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साकव पूल, पिकअप शेड, पेव्हींग ब्लॉक, हायमास्ट दिवे अशी कामे केली असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगून, श्रीमंत रामराजे यांच्याकडे 30 वर्षे सत्ता असून शहरासह तालुक्यासाठी काय केले? शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची काय अवस्था आहे, तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाही, 30 वर्षात काहीच विकास करू शकलो नाही हे लक्षात आल्यानंतर आता, मी पाठपुरावा करून मंजुरी आणलेल्या फलटण - आदर्की रस्त्याच्या  कामाचे श्रेय घेऊ लागले असल्याची टीका खा. रणजितसिंह यांनी केली.

रामराजे जरा आपण डोळ्याने पाहावे  साखरवाडी  कारखाना  दुसऱ्याला मध्यस्थी घालून  कोणी गिळलंय हे सर्व फलटण तालुक्याला माहित आहे. अजून 25 कोटी रुपये देण लोकांचे बाकी आहे. आणि तुम्ही तुमची ताकत आणि पोलीस यंत्रणा वापरून जी लोक देणी मागायला येतात त्यांना सांगताय कि रामराजे यांना जाऊन भेटा, आणि तिथे लोकांना सांगताय कि पक्षात प्रवेश करा, या धारूला इथे आणलाय आणि शेकडो कोटी रुपयांचा कारखाना केवळ 68 कोटी रुपयांना गिळलंय, आणि ह्याच मंडळींनी कारखान्यात आपली भागीदारी केली आहे. धारूने यांना का भागीदारी  लोकांना अश्या पैसे बुडवायच्या लोकांसाठी प्रश्न विचारायचा आहे, कायम हे सांगतात कि स्वराज ची बिले होत नाहीत, स्वराज मजबूत आहे खंबीर आहे. पुढच्या वर्षी स्वराज कारखाना महाराष्ट्र मधील सर्वात मोठा  कारखाना म्हणून असेल असेही खासदार  म्हणाले.त्या नंतर खासदार  बोलताना म्हणाले कि गेल्या वर्षी सर्वात जास्त उसाचा दर 2600 रुपये स्वराज ने दिला आहे.या वर्षी ही त्यांच्या पेक्ष्या जास्त दर देणार आहेच, पुढच्या  वर्षी आमच्याशी स्पर्धा आहे तुमची 15 हजार  टनाने स्वराज कारखाना आम्ही चालवणार आहे.


      रामराजे नेहमी बोलतात कि जनतेच्या पैश्याचे नुकसान होऊ देनार नाही, मात्र जनतेच्या पैश्याचे नुकसान होऊन आज जो काय शिंदे डेव्हलपर्स मध्ये किंवा अन्य कंपन्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार हा काय घरचा पैसा आहे काय, रामराजे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे साधू सन्याशी नाही, लवासा मधल्या प्रकरणासह सगळी प्रकरणे रणजितसिहं नाईक निंबाळकर यांना माहित आहे.हॉटेल निसर्ग, सुरवडी ता. फलटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी दिशा कमिटी सदस्य विश्‍वासराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य व युवा नेते धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, बजरंग गावडे, नानासाहेब इवरे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते उपस्थित होते.

धारू मस्तीत जाऊ नका 

साखरवाडी  कारखान्याचे 25 कोटी शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत.धारू मस्तीत जाऊ नका सरकार कधीही बदलेल,या साखरवाडी कारखान्याच्या उसाचे थकीत हे थकीत शेतकऱ्यांची पैसे तुम्हाला द्यावे लागतील. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. आम्ही सर्व परीने तुम्हाला मदत करू असेही खा. रणजितसिंह म्हणाले,मात्र शेतकऱ्यांची बिले द्यावी लागतील, धारू चे आत्ता उसाची बिले चांगली देत आहे आमचे काय म्हणणे नाही मात्र रामराजेच्या नादाला लागून जर शेतकऱ्यांचे 25 कोटी धारू ने घश्यात घालायचा प्रयत्न केला तर धारूला गाठ माझ्याशी आहेत असेही खासदार म्हणाले.

   
 नाईकबोमवाडी एम.आय.डी.सी.रद्द करण्यासाठी रामराजे यांचे प्रयत्न


फलटण मध्ये नाईकबोमवाडी येथे मी दुसरी एमआयडीसी मंजूर करून आणली होती आणि त्याची घोषणा देखील केली होती. परंतु मंजूर केलेल्या एमआयडीसीमध्ये खोडा घालण्याचे काम याच रामराजे यांनी केले आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. नाईकबोमवाडी एमायडिसी करायची नाही म्हणून रामराजे यांच्याकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला.