धक्कादायक,पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार

सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडेवर फलटण तालुक्यात गोळीबार,सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

धक्कादायक,पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार

धक्कादायक,पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार

सहाय्यक पोलिस सोमनाथ लांडेवर फलटण तालुक्यात गोळीबार,सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

फलटण / प्रतिनिधी-

दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले गावात घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. पण या दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. पण या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे असे गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे असे गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत व आत्ता वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सिंघम सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना फलटण तालुक्यातील वडले येथे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडलीआहे.सोमनाथ लांडे हे सहकाऱ्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले असताना ही घटना घडली. 

दरम्यान सपोनि सोमनाथ लांडे हे सहकाऱ्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या जबरी चोरीतील आरोपी संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्याना मिळाली होती. सह्हायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी यापूर्वी  फलटण शहर पोलिस ठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण तालुक्यातील सर्वच भागाची चांगलीच माहिती त्यांना आहे. 

वडले येथे गेल्यावर गावठी पिस्टल मधून त्यांच्यावर संशयिताने गोळीबार केला, असल्याची माहिती सूत्रांच्या  कडून मिळत आहे.या घटनेत कोणीही गंभीर झालेले नाही. 

फलटण तालुक्यातील वडले येथे हा प्रकार घडला.  फलटण-शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून ९ किमी अंतरावरील आहे. २६ ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सोने चांदी व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत  त्यांच्याकडील ११ लाख ६६ हजारांचे दागिने अज्ञातानी जबरीने चोरुन पसार झाले होते. 

याबाबत  अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती. २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणाऱ्या कुलथे याना उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे.