धक्कादायक,दारू सदृश लिक्विड पिल्याने दोघांचा मृत्यू

दारु सदृश लिक्विड पिल्याने त्यास उलटी,चक्कर सारखे त्रास होऊन जिंती येथिल दोघे मृत पावले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारुविक्री बंद असल्याने अनेक तळीराम दारु नसल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे असे त्यांना वाटत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

धक्कादायक,दारू सदृश लिक्विड पिल्याने दोघांचा मृत्यू

फलटण प्रतिनिधी - 

दारु सदृश लिक्विड पिल्याने त्यास उलटी,चक्कर सारखे त्रास होऊन जिंती येथिल दोघे मृत पावले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारुविक्री बंद असल्याने अनेक तळीराम दारु नसल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे असे त्यांना वाटत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
        
काही ठिकाणी तर दारुविक्रीची दुकाने या महाशयांनी फोडून दारु लंपास केली असल्याच्या घटना घडल्या आहेत.तर काहीजणांनी हातभट्टी लावून दारु तयार करणेचा उद्योग सुरु केला आहे मात्र हे तळीराम दारू प्राशन करण्यासाठी काही  वेगवेगळ्या शक्कल अक्कल लढवितांना दिसत आहेत.
    
असाच प्रकार जिंती येथे दारुचे व्यसन असणाऱ्या दोघांना दारु भेटत नाही म्हणून या व्यसनाधिशांनी  दारु सदृश लिक्विड पिल्याने त्यास उलटी चक्कर सारखे त्रास जाणवू लागल्याने त्यास फलटण येथिल खाजगी दवाखान्यात दाखल केले  असता त्याच्यावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.दि.२६ रोजी किरण सुरेश सावंत वय ३२ यास उलट्या येत असल्याने दवाखाण्यात दाखल केले होते.व त्याच्यावर उपचार सुरु होते.तर दिपक राघु जाधव वय ३० याचे रोजी या सर्वांना उलटी चक्कर त्रास झाल्याने त्यांना फलटण येथिल खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले होते परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच ञास झाल्याने यात या दोघेही मृत झाले असून या दोघांचे मृत देह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे आणण्यात आले.याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत संबधित  सागर राघु जाधव रा.जिंती वय २९, मधुकर सखाराम रणवरे वय ५२ यांनी वेगवेगळ्या खबर दिली असून अधिक तपास फलटण ग्रामीणचे पोलिस अधिकारी करीत आहेत.
----------------------------------------------------------------------

'जिंती मध्ये बोगस दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट'


फलटण तालुक्यातील जिंती या ठिकाणी अनेक हातभट्टी चे लिक्विड दारूचे धंदे आहेत.नक्कीच हे धंदे राज्य उत्पादन शुल्काच्या व फलटण ग्रामिण पोलिसांच्या वरदहस्ताने चालत असल्याची चर्चा जिंती गावात सुरू आहे,अजून किती जनांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असे जिंतीतील लोकांच्या कडून बोलले जात आहे.