अपहरण झालेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडला विहिरीत

फलटण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ

अपहरण झालेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडला विहिरीत

फलटण प्रतिनिधी - 
फलटण तालुक्यातील काळज या ठिकाणी अपहरण झालेल्या अवघ्या १० महिन्यांच्या लहान बाळाचे अपहरण मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या सुमारास त्याच्या घरातून अपहरण झाले होते.
 अपहरण झालेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण काळज गावांमध्ये निर्माण झाले आहे. गेली दोन दिवस या अपहरण प्रकरणी सातारा पोलिसांचा तपास जोरात सुरू होता. मात्र त्याची अखेर मात्र वाईट झाली.
अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस त्या घटनेचा रात्र - दिवस शोध घेत होते. तपासासाठी तब्बल ८ पोलिसांचे पथक केले होते. आता मृतदेह सापडल्याने त्याचे अपहरण कोणी केले,का खून कोणी केला? नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित झाला असून घटनेचे गूढ वाढले आहे.