फलटण तालुक्यात अजून एकाला कोरोनाची लागण

फलटण तालुक्यात अजून एकाला कोरोनाची लागण

फलटण - फलटण तालुक्यात अजून एकाला कोरोना ची लागण झालेचे चित्र स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तरडगाव येथिल पहिली कोरोना पॉझिटिव्ह मुलगी ही बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी तिचा अहवाल प्राप्त झाला त्यात ही कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली होती.
    व त्या रुग्णाचा ज्या लोकांशी संपर्क आलेला आहे अशा सर्व रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणी साठी  पाठवण्यात आले होते.त्या मधील त्या रुग्णाच्या आईचा रिपोर्ट हा पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

मात्र कोविड-१९ विषयी पूर्वी दिलेल्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात धुणे इ. सारख्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून बाहेरगावावरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनास देणे आवश्यक आहे.
याशिवाय स्थानिक व बाहेरगावावरुन आलेल्या आणि खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.