फलटण शहरातील निल्या मच्छलीचा खून

फलटण शहरातील निल्या मच्छलीचा खून

फलटण शहरातील निल्या मच्छलीचा खून

फलटण प्रतिनिधी -

फलटण तालुक्यातील क्रु-प्रसिध्द असलेला निलेश हिरालाल चव्हाण ऊर्फ (निल्या मच्छली) याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे,तर त्याचा मित्र भरत फडतरे याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात मिळालेली अधिक माहिती अशी की,काल बुधवार दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील शंकर मार्केट येथे टोपी चौकात निल्या मच्छली व त्याचा मित्र भरत फडतरे या दोघांना आमच्या गल्लीतील मुलींची  छेड  काढतोस काय असे म्हणून सलीम शेख,व त्याची मुले सैफुल्ला शेख, जुबेर शेख,बिलाल,राज बागवान,व इतर काही लोकांनी मारहाण करण्यात आली आहे.

यामध्ये निलेश चव्हाण उर्फ निल्या मच्छली चा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर त्याचा मित्र भरत फडतरे हा गंभीर जखमी झाला आहे.भरत फडतरे वर बारामती येथे उपचार सुरू आहेत.

संशयित आरोपी सलीम शेख,सैफुल्ला शेख, जुबेर शेख,(रा.कुंभारटेक फलटण)बिलाल,राज बागवान, यांच्यावर रात्री उशिरापर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.