प्लास्टिक कपापासून गांधीजींच्या प्रतिमेची निर्मिती

प्लास्टिक कपापासून गांधीजींच्या प्रतिमेची निर्मिती

कराड/प्रतिनिधी : 

                         देशभरात विविध उपक्रम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजारीकारण्यात आली. त्यानुसार कराड नगरपालिकेने महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून सिंगल युज प्लास्टिकवर बंदीची अंमलबजावणी केली. त्याचबरोबरच प्लास्टिकच्या आईस्क्रीम कपापासून गांधीजींची भव्य प्रतिमा कराड नगरपालिके साकारण्यात आली आहे. या माध्यमातून नगरपालिकेने धोरणांतर्गत उपक्रम म्हणून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वापरून ही प्रतिमा बनवण्यात आली आहे.

                       कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाण्यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत शहरात सहा ठिकाणी कारंजे उभारण्यात येणार आहेत. तर त्यापैकी प्रशासकीय इमारत व कोल्हापूर नाक्यावरील कारंजा सुरू करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये रणगाडा व विमान या वॉर ट्ॉली ठेवण्यात आल्या आहेत. आय लव्ह कराड हा सेल्फी पाईन्ट उभारण्यात आला आहे. सिंगल युज प्लास्टीकच्या वापरावर केंद सरकारने बंदी घातली असून याची अंमलबजावणी  ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ही मोहीम सुरू करताना नगरपालिकेने असे प्लास्टिक नागरिकांकडून गोळा करण्याची मोहीमही सुरू केली आहे.

                      महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांची कायमस्वरूपी प्रतिमा शहरात बनवण्यात यावीयासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या धोरणाचा अवलंब व्हावाअशी संकल्पना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मांडली होती. त्यानुसार आर्टिस्ट नितीन भोसले यांना हे काम देण्यात आले. त्यांना त्यांचे बंधू प्रतीक भोसले यांनीही मदत केली. त्यांनी प्लास्टिकचे हजार 116 कप वापरून गांधीजींची प्रतिमा तयार केली. ही प्रतिमा तयार करण्यासाठी 12 फुट आकाराचे पॅनेल वापरण्यात आले आहे. त्यावर आडवे 46 व उभे 46 आईसक्रीम कप वापरण्यात आले आहेत. सहा रंगांचा वापर करून कप चिकटवण्यात आले आहेत. ही प्रतिमा तयार झाली असून जयंतीनिमित्त ती नगरपालिकेत ठेवली आहे. ही प्रतिमा प्रीतिसंगम बागेत ठेवण्यात येणार आहेअसे नोडल ऑफिसर आर. डी. भालदार यांनी सांगितले.

                     शहरात प्लास्टिकवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली असून सिंगल युज प्लास्टिक बंदीचीही अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार आहे. प्लास्टिकबंदी बाबत प्रबोधन करण्याबरोबरच टाकाऊपासून टिकाऊ हे धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रतिमा बनवण्यात आली आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदेउपनगराध्यक्ष जयवंतराव पाटीलगटनेते राजेंद्रसिंह यादवसर्व नगरसेवकअधिकाऱयांचे याकामी मार्गदर्शन लाभले आहे. 

 

नगरपालिका प्रांगणात दोन राजहंस

 टाकाऊपासून टिकाऊ या धोरणांतर्गत नगरपालिकेच्या प्रांगणात दोन राजहंसांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. हे राजहंस बनवण्यासाठी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात येणार आहेत.