ग्रामीण भागात तरुण युवा वर्गावर पोलीस प्रशासनाने वॉच ठेवण्याची गरज

अनेक गावांमध्ये तरुण युवक जमाव करून फिरताना व बोलत बसताना दिसत आहेत तर काही तरुण रात्री एन्जोय म्हणून पार्टी करताना दिसत आहेत. असाच प्रकार ग्रामीण भागात घडू लागल्यास महाराष्ट्राची चीन व इटली सारख्या देशांसारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रकार थांबवण्यासाठी संबधित प्रशासनाने व ग्रामपंचायतीने अशा तरुणांना समजून सांगण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात तरुण युवा वर्गावर पोलीस प्रशासनाने वॉच ठेवण्याची गरज

रात्रीच्या वेळेस होतायत काही गावांमध्ये पार्ट्या
मल्हारपेठ / विकास कदम 
भारतात कोरोणा (व्हायरसने) धुमाकूळ घातला असून देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५९३ तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२४ वर पोहचला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसते व जगभरात २१ हजार दोनशे जणांचा कोरोना या व्हायरसने मृत्यू झाला आहे. असे असताना देखील ग्रामीण भागातील काही तरुणांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना गर्दीमुळे पसरू शकतो हे तर स्पष्टच आहे. संचार बंदी असताना सुद्धा मुंबई पुणे व बाहेरून गावी आलेले ग्रामीण भागातील काही गावं वगळता अनेक गावांमध्ये तरुण युवक जमाव करून फिरताना व बोलत बसताना दिसत आहेत तर काही तरुण रात्री एन्जोय म्हणून पार्टी करताना दिसत आहेत. असाच प्रकार ग्रामीण भागात घडू लागल्यास महाराष्ट्राची चीन व इटली सारख्या देशांसारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रकार थांबवण्यासाठी संबधित प्रशासनाने व ग्रामपंचायतीने अशा तरुणांना समजून सांगण्याची गरज आहे.

एकीकडे संबधित प्रशासन कोरोना व्हायरस ला आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र संबधित प्रशासनाच्या संचार बंधीला काही गावं वगळता ग्रामीण भागातील काही तरुणांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बोटावर मोजण्याइतकी गावं वगळता पोलिस बंदोबस्त नसताना देखील नागरिक सतर्क राहत आहेत व बाहेर पडण्याचे टाळत आहेत. संचार बंदीच्या काळात ग्रामीण भागात देखील संबधित प्रशासनाने अशा तरुणांनवर वेळीच वॉच ठेवून होत असलेले असे प्रकार थांबवण्याची अवश्यकता आहे