पुणे-बेंगलोर दरम्यान ४० हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग -नितीन गडकरी

सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला वारंवार महापुराचा फटका बसत आहे. परंतु, आता या महामार्गाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच पुणे-बेंगलोर दरम्यान ४० हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग बांधणार आहे.

पुणे-बेंगलोर दरम्यान ४० हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग -नितीन गडकरी

पुणे-बेंगलोर दरम्यान ४० हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग 

नितीन गडकरी - पुणे-कोल्हापूर ब्रॉडगेज मेट्रो, राज्यात जल वाहतूक सुरु करण्यासाठीही प्रयत्नशिल

कराड/प्रतिनिधी :            

      सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला वारंवार महापुराचा फटका बसत असून काही ठिकाणी महामार्ग पाण्याखाली जात आहे. त्यामुळे रस्ता खराब होऊन लोकांनाही त्रास समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु, आता या महामार्गाची दुरुस्ती करणार असून कसलाही पूर आला तरीही पाण्याचा एकही थेब महामार्गावर येणार नाही, असे आश्वासन देत पुणे-बेंगलोर दरम्यान ४० हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग बांधणार असल्याची घोषणा वाहतुक, महामार्ग व जहाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

      येथील हॉटेल फर्न येथे शनिवारी 25 रोजी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय महामार्ग, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व कोनशीला अनावरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. 

           यावेळी सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, खा. संजय मंडलिक, खा. संजय पाटील, खा. धैर्यशील माने, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मोहनराव कदम, आ. जयंत आसगावकर, आ. दीपक चव्हाण, आ. प्रकाश आबिटकर, आ. मानसिंगराव नाईक, आ. महेश शिंदे, आ. विक्रमसिंह सावंत, आ. ऋतुराज पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे, आ.सुधीर गाडगीळ यांच्यासह रस्ते वाहतुक विभागाचे मुख्य अभियंता राजीव सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.