उमेदवारांच्या 'मेसेज' ने 'पदवीधर' हैराण

सततच्या डोस मुळे नंबर ब्लॅक लिस्ट

उमेदवारांच्या 'मेसेज' ने 'पदवीधर' हैराण

उमेदवारांच्या 'मेसेज' ने 'पदवीधर' हैराण

सततच्या डोस मुळे नंबर ब्लॅक लिस्ट

उंब्रज/प्रतिनिधी

पदवीधर मतदार नोंदणी करताना दूरध्वनी क्रमांक देणे बंधनकारक असल्याचा मोठा तोटा सध्या पदवीधर मतदारांना होत असल्याची मोठी चर्चा आहे.सतत कोणत्यातरी उमेदवारांचा मेसेज मला मतदान करा या विनवणी साठी येत आहे.तसेच काही पक्षांचे नेते "रेकॉर्डिंग व्हाईस' कॉल करत असून आम्ही कसे चांगले आणि इथून पुढे पदवीधरांसाठी काय काय करणार याची बतावणी करत आहेत.परंतु आज पर्यत जे निवडून गेले त्यांनी काय दिवा लावला याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत.यामुळे पदवीधर मतदार हैराण झाला असून निवडणुकीत इंगा दाखविण्याचा मनोदय व्यक्त केला जात आहे. 

पुणे पदवीधर मधून बरेच उमेदवार निवडणुकीसाठी उभे असून सर्वांनीच आता सोशल मीडियावर धडाका लावला आहे.पदवीधरांना हैराण करण्याचा सपाटा सुरू असल्याने बहुतेकांनी असे मेसेज ब्लॅक लिस्ट केले असून पदवीधरांना या राजकीय धुळवडीची चीड निर्माण झाली असून कामा पुरते गोड बोलणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या बगल बच्चे यांना त्यांची जागा दाखविण्याचा मनोदय व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे.