पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघातात दोन पत्रकार ठार

पुणे सातारा महामार्गावर  भीषण अपघातात दोन पत्रकार ठार

वाई / प्रतिनिधी


पुणे सातारा महामार्गा वरील अनवडी गावच्या हद्दीत कार आणी दुचाकीचा झालेल्या भिषण अपघातात पत्रकार मंदार कोल्हटकर आणी धिरज पाटील या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील पत्रकारांन मध्ये शोककळा पसरली आहे  .या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे .

भुईंज पोलिस पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दै.तरुण भारतचे पत्रकार मंदार कोल्हटकर आणी धिरज पाटील हे दोघेजण खंडाळा येथून  आपल्या दुचाकी वरुन सातारच्या दिशेने जात असताना पाठीमागुन भरघाव वेगात येणारी कार क्र.एम.एच.९ डि.एम.८१६६ ने दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने वरील दोन्हीही पत्रकार गंभीर जखमी अवस्थेत महामार्गावर पडले .त्यांचा रक्तस्राव भरपूर झाल्याने त्यांना प्रथम जखमी अवस्थेत कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचारा साठी दाखल केले होते .पण तेथे आवश्यक औषधे उपचारा साठीची सोय नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते .पण तेथील ऊपस्तीत डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले .


या अपघाताची माहिती मिळताच वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी हवलदार राजाराम माने हे घटना स्थळावर दाखल झाले होते .यांनी ज्या कारने या दोन्ही पत्रकारांच्या दुचाकीला धडक देवुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने विजय पुनचंद शहा वय ७५ राहणार कोल्हापूर या कार चालकाला तातडीने ताब्यात घेवुन त्याची कार जप्त केली आहे .त्याचा अधिक तपास सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ऊपनिरिक्षक विशाल भंडारे करीतआहेत .