पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण 

पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण 

 

म्हसवड  :

पुराचे वाहून जाणारे पाणी राज्यात एकमेव कोरडी ठणठणीत असलेल्या माणगंगा नदीत सोडून दुष्काळी माण तालुक्याची तहान भागवावी या मागणीसाठी 15ऑगस्ट रोजी म्हसवड येथे निवृत्त अभियंता सुनिल पोरे, पत्रकार पोपट बनसोडे, पत्रकार धनंजय पानसांडे यांनी आमरण उपोषण सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र पाऊसाने थैमान घातल्याने कोल्हापूर सांगली कराड सातारा या शहरा मध्ये अतोनात नुकसान झाले, जिवित हानी झाली ही परिस्थिती केवळ अति पावसाने झाली आहे. हे वाहून वाया जाणारे पाणी उरमोडीच्या पात्रातून कायम दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगा नदीत सोडण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे केली होती.यावर केवळ ढाकणी पिंगळी, लोधवडे या तलाव्यात सोडण्याचे आदेश दिले असून उपोषण कर्त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या असून माण तालुक्यातील शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. माण तालुक्यातील जनता गत सहा महिण्यापासून दुष्काळ परिस्थितीला सामोरी जात आहे. सहा महिणे झाले तालुक्यात 91चारा छावण्यात 50हजार जनावरे घेऊन जगाचा पोशिंदा  बळीराजा उपासी तापासी जिवन कंठत आहे. तर 100टॅकर तालुक्यातील जनतेची तहान भागवत आहेत. तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक तरूणांना रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरात भ्रमंती करावी लागत आहे.

अतिवृष्टीमुळे मोठ्या शहरात पाण्याने अनेकांचे बळी घेतले आहेत.ओळा दुष्काळ जाहिर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर माण तालुका हा एकमेव पाऊसाने पाठ फिरवलेला तालुका असून पावसा अभावी माण तालुक्यातील जनतेला स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. माण तालुक्यातील जनतेला दुष्काळी परिस्थिती तून बाहेर काढण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडल्याने शासनाचा कोट्यावधी रूपयांची बचत होणार असून 50टक्के दुष्काळ हटणार आहे. वरील मागणीचे निवेदन देऊनही शासनाने दखल घेतली नसल्याने म्हसवड येथील महात्मा फुले पुतळ्या शेजारी निवृत्त अभियंता पत्रकार पोपट बनसोडे पत्रकार धनंजय पानसांडे यांनी म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा  फुले  भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याना पुष्प हार घालून उपोषणास सुरू केले असून, या उपोसणाची खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यानी दखल घेतली असून माणचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली आहे. तर नगरसेवक विकास गोंजारी,अकिल काझी नगरसेवक केशव कारंडे, आप्पासाहेब पुकळे, माजी उपनगराध्य कुमार सरतापे  संजय भागवत, प्रा.गुलाबराव खाडे करण पोरे शुभम पोरे, रामचंद्र नरळे, महेश लिंगे सचिन सरतापे, अशोक बनसोडे अनिलकुमार व्होरा अजितकुमार व्होरा अॅड.राजेद्र भागवत अजिनाथ केवटे ग्राहक प्रबोधन समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश डावकरे व संदिप माने दिपक चिंचकर, विक्रम कोले मोहन सरतापे यांनी पाठिंबा दिला आहे