कुंभार व्यावसायिकांच्या नुकसानीचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार -रवींद्र वायकर

कुंभार व्यावसायिकांच्या नुकसानीचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार -रवींद्र वायकर

 

 पूरग्रस्त पाटण कॉलनी, कुंभार व्यावसायिकांची भेट 

कराड/प्रतिनिधी : 
                       अलमट्टीचा फुगवटा आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे  येथील गणेशमूर्ती बनवणाऱ्या कुंभार व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या संपूर्ण नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत. तसेच मुंबई येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपण कुंभार व्यवसायीकांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी, यासंदर्भात प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही गृहनिर्माण उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. 
                    पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कराड येथे आले असता कुंभार समाज, व्यावसायिकांनी शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर
यांना आपल्या नुकसान भरपाई व अन्य मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी  नुकसानी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही दिली आहे. 
                     यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे गटनेते नितिन बानुगडे-पाटील, शशिकांत हापसे, नितिन काशीद आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.