राहुल गांधींचे सुसंवाद अभियान 

राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला बरेच यश देणारा असेल. या माध्यमातून लोकांना विरोधी पक्षाची नेमकी बाजू समजावी, सरकारने काय निर्णय घेतले, त्यामागची पार्श्वभूमी समजावी तसेच सरकार कोणत्या बाबी दडपत आहे, याचेही आकलन होईल. यामुळे कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आज सत्ताधारी पक्ष एवढा प्रबळ आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व निर्णय एका बाजूनेच मंजूर होत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीला खरी बाधा येते, एकाधिकारशाही निर्माण होते. ती कोंडी फोडून जनतेच्या मनातील भावना मांडण्याचे काम राहुल गांधी करतील, अशी अपेक्षा आहे. 

राहुल गांधींचे सुसंवाद अभियान 

राहुल गांधींचे सुसंवाद अभियान 

संपादकीय / अग्रलेख 

राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला बरेच यश देणारा असेल. या माध्यमातून लोकांना विरोधी पक्षाची नेमकी बाजू समजावी, सरकारने काय निर्णय घेतले, त्यामागची पार्श्वभूमी समजावी तसेच सरकार कोणत्या बाबी दडपत आहे, याचेही आकलन होईल. यामुळे कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आज सत्ताधारी पक्ष एवढा प्रबळ आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व निर्णय एका बाजूनेच मंजूर होत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीला खरी बाधा येते, एकाधिकारशाही निर्माण होते. ती कोंडी फोडून जनतेच्या मनातील भावना मांडण्याचे काम राहुल गांधी करतील, अशी अपेक्षा आहे. 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेली सहा वर्षे मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत. मोदींनी याद्वारे देशातील लोकांशी जनसंपर्क ठेवला असून आता देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांना तशा कार्यक्रमाची गरज वाटू लागली आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवतानाच लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचण्याची आवश्यकता नेत्यांना वाटू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की,  सध्या आम्ही योजना आखत आहोत आणि त्यावर कसे काम करता येईल, यावर चर्चा करीत आहोत. आम्ही त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेत आहोत. याबाबतचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. कॉंग्रेस पक्षाची गेल्या सहा वर्षांत मोठी वाताहत झाली आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात कॉंग्रेसची धुरा योग्यरीतीने सांभाळली होती. परंतु काही काळानंतर राहुल गांधी सत्ताधाऱ्यांच्या टीकेपुढे नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पूर्वीप्रमाणे दारुण पराभव झाल्यानंतर राहुल यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरे तर त्यावेळी कॉंग्रेस अडचणीत असताना कप्तानाने जहाज सोडणे योग्य नव्हते. परंतु राहुल यांनी बाजूला बसण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांनी त्यावेळी काळाची पावले ओळखून पुनश्च हरी ओम करत कॉंग्रेसला चेतना देणे अपेक्षित होते. आता दर से लेकीन दुरुस्त अशा पद्धतीने राहुल गांधी यांनी पॉडकास्ट कार्यक्रम सुरु करण्याचे ठरवले आहे, ते योग्यच आहे. यामुळे त्यांना देशवासियांशी नेमका संवाद साधता येईल आणि कॉंग्रेसची धोरणे व सत्ताधाऱ्यांची नीती यावर प्रकाश टाकता येईल. राहुल गांधी हे आता राजकारणात सावरत चालले आहेत. ज्याप्रकारे त्यांचे पिता स्व. राजीव गांधी हे पंतप्रधानपदी असताना देशवासियांशी संपर्क साधायचे, ते पाहता राहुल गांधी यांनी तोच मार्ग निवडला हे ठीक आहे. राहुल यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा देशात काय हवे, सत्ताधाऱ्यांनी जनतेसाठी काय करणे आवश्यक आहे, जनतेला प्रतिकूल परिस्थितीत धीर कसा देता येईल, हे काम पॉडकास्ट कार्यक्रमाद्वारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल आणि कॉंग्रेसशी जनतेचा संवाद वाढेल, जो आज तुटला आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या या कार्यक्रमाचे दूरगामी परिणाम कॉंग्रेसवर होऊन पक्षात एक चेतना निर्माण होणार आहे.                                     राहुल गांधी ज्या पॉडकास्ट कार्यक्रमाची रूपरेखा तयार करत आहेत, तो पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते. काँग्रेस नेत्याने सांगितले की, एकदा यासंदर्भातील गोष्टी अंतिम ठरल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी पॉडकास्ट कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांच्या मन की बातला उत्तर देतील. तसेच, लिंक्डइनसह इतर प्लॅटफॉर्मवरही आम्ही विचार करत आहोत, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च केले होते. मात्र, लॉकडाऊच्या काळात याचा जास्त करून वापर करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात लोक घराबाहेर नव्हते, अर्थातच ते समाजमाध्यमांचा वापर करत आहेत. त्यामुळे राहुल यांनी योग्य वेळ साधून जनतेशी संवाद सुरु ठेवला आहे. या यूट्यूब चॅनेलचे आतापर्यंत 2,94,000 सब्सक्राइबर आहेत.राहुल गांधी यांनी लॉकडाऊन दरम्यान मजुरांशी साधलेला संवाद 7,52,000 लोकांनी पाहिला आहे. तर आरोग्य तज्ज्ञ आशिष झा आणि कोरोनो व्हायरसबद्दल प्रोफेसर जोहान गिसेके यांच्याशी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ 90,000 लोकांपर्यंत पोहोचला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांचे  ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. काँग्रेसच्या नेत्याने असा दावा केला आहे की, कोरोनो विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दि. 2 मे रोजी झालेले स्पीक अप इंडिया हे ऑनलाइन अभियान चांगले यशस्वी झाले. यामध्ये 5.7 मिलियनहून अधिक आपले मेसेज पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. दरम्यान, काँग्रेसच्या या योजनेवर मुंबईतील पॉडकास्टर अमित वर्मा यांनी सांगितले की, नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पॉडकास्टिंग हा संभाषण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. मात्र, त्यावेळी राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूने संवाद साधावा. त्यांना लोकांशीच नव्हे तर लोकांशी बोलण्याचा मार्ग शोधावा लागेल.राहुल गांधी हे सध्या तेच करत आहेत.                                 पॉडकास्ट या कार्यक्रमाद्वारे राहुल गांधी लोकांशी जास्त संवाद साधतील, त्यावेळी त्यांना ट्रोल करणारी मंडळीही समाजात आहेत. परंतु त्यांनी आपले मनोधर्य खचू न देता सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांना तोंड दिले पाहिजे. विरोधक नेत्याच्या अनेक अशक्त (कमकुवत ) बाबींचा अभ्यास करून त्या नेत्याला त्रास देतात, त्याची टर उडवणे, अफवा पसरवणे असे प्रकार गेल्या सहा वर्षांत जनता पाहत आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला बरेच यश देणारा असेल. या माध्यमातून लोकांना विरोधी पक्षाची नेमकी बाजू समजावी, सरकारने काय निर्णय घेतले, त्यामागची पार्श्वभूमी समजावी तसेच सरकार कोणत्या बाबी दडपत आहे, याचेही आकलन होईल. यामुळे कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आज सत्ताधारी पक्ष एवढा प्रबळ आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व निर्णय एका बाजूनेच मंजूर होत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीला खरी बाधा येते, एकाधिकारशाही निर्माण होते. ती कोंडी फोडून जनतेच्या मनातील भावना मांडण्याचे काम राहुल गांधी करतील, अशी अपेक्षा आहे.