राज्यसभेच्या दोन जागांसाठी गुजरातमध्ये मतदान

राज्यसभेच्या दोन जागांसाठी गुजरातमध्ये मतदान

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
राज्यसभेत  असलेल्या दोन जागांसाठी गुजरातमध्ये
मतदानाला सुरुवात झाली आहे. अमित शाह आणि स्मृती
इराणी यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे या दोन
जागा खाली झाल्या आहेत. या दोन्ही जागेवर परत विजय
प्राप्त करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
मतदानासाठी काँग्रेसने देखील आपले आमदार
कडक बंदोबस्तामध्ये मतदानासाठी गांधीनगरला
रवाना केले आहेत. अमित शाह आणि स्मृती इराणी यांची
लोकसभा निवडणुकांमध्ये विजय झाल्यामुळे त्यांच्या
राज्यसभेतील दोन जागा खाली झाल्या आहेत. यासाठी आज
गुजरातमध्ये मतदान सुरु झाले आहे. एकीकडे भाजप
आपल्या जागा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.तर
काँग—ेस देखील त्यापैकी एका जागेवर विजय
मिळवण्यासाठी जोर लावत आहे.
गुजरात विधानसभेमध्ये 182 सदस्य आहेत. मात्र या
निवडणुकीमध्ये 175 आमदार मतदान करणार आहेत.
गुजरातमध्ये भाजपचे 100 आणि काँग—ेसचे 71 आमदार
आहेत. एका उमेदवाराला विजय प्राप्त करण्यासाठी 50
म्हणजेच 71 आमदारांची मते हवी आहेत.