रमाई आवास योजनेत कराड पंचायत समितीची बाजी

रमाई आवास योजनेत कराड पंचायत समितीची बाजी

राज्यात पटकवला चौथा क्रमांक : जिल्ह्याभरात कौतुक 

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड पंचायत समितीने राज्य ग्रामीणविकास विभागांतर्गत रमाई आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी राज्यात चौथा क्रमांक पटकवला आहे. त्यामुळेकराड पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या सोबत जिल्ह्यात कराड पंचायत समितीचे सर्व अधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 
                        नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्य सचिव अजय मेहता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते कराड पंचायत समितीला या पुरस्काराचे गौरव प्रमाणपत्र देण्यात आले.