रोटरीतर्फे पार्ले कोरोना सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

रोटरीतर्फे पार्ले कोरोना सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सुपूर्द करताना अध्यक्ष रो. गजानन माने व इतर मान्यवर

रोटरी क्लब ऑफ कराड व रोटेरीयन शशांक पालकर यांचे सहकार्य

कराड/प्रतिनिधी :
          रोटरी क्लब ऑफ कराड व रोटेरीयन शशांक पालकर परिवाराच्या आर्थिक सहकार्याने पार्ले येथील शासकीय कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आले. याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना याचा फायदा होईल, यासाठी हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आले.
          येथील कोविड केअर सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकारी डॉ. शुभलक्ष्मी जोशी पार्ले गावचे तलाठी सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 18 रोजी सदर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने क्लबचे अध्यक्ष रो. गजानन माने, सचिव रो. डॉ. शेखर कोगणुळकर, रो. शशांक पालकर, रो. डॉ. राहुल फासे, रो. प्रबोध पुरोहित आदी. उपस्थित होते.