सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवडेत स्वच्छता अभियान

सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवडेत स्वच्छता अभियान
सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवडेत स्वच्छता अभियान

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : सुमारे 10 टन कचरा संकलन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग 

कराड/प्रतिनिधी :

          समाजसेवक सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत बेलवडे ब्रुद्रुक ता. कराड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानात सुमारे 10 टन कचरा संकलित करण्यात आला. मोहिमेस युवकांसह ग्रामास्थांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.

          येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून मंगळवारी 3 रोजी सकाळी 6 वाजता या स्वछता अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, बेलवडे बुद्रुक गावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठानचे सदस्य, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           ग्रामस्वच्छतेसाठी एकून तीन टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायत कार्यालय-लक्ष्मी मंदिर ते हनुमान मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर-नागोबा मंदिर-हनुमान मंदिर ते स्मशानभूमी परिसर व दत्त मंदिर, बाजारपेठ परिसर, जनार्दन मंदिर या भागात त्या-त्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. तीन टीममध्ये सुमारे अडीचशे जणांचा समावेश होता. कचरा गोळा करण्यासाठी पिकप व चार ट्रँक्टर आणि इतर आवश्यक साहित्य अशी यंत्रणा वापरण्यात आली. 

           सकाळी 6 ते 9 या वेळेत राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत युवक, ग्रामस्थांनी सुमारे 10 टन कचरा गोळा केला. त्यानंतर गोळा केलेल्या कचऱ्याचे एकत्रीकरण करून त्याचा विघटन करण्यात आले. या अभियानाचे ग्रामस्थांनीही कौतुक केले. तसेच स्वच्छता अभियानास युवकांसह ग्रामास्थांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.

          दरम्यान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राज्यभरात सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, अंध व मुखबधीर विद्यार्थांना मदत. उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, जनजागृती शिबीर, पाणपोई,  आपतग्रस्तंना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या काही वर्षापासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या या महान कार्याची मा. पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांनी दखल घेत त्यांनी जेष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून सांगण्यात आले. 

…………………………………………………………………………

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यभरात सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यानुसार बेलवडे ब्रुद्रुकमध्ये स्वछता अभिमान राबविण्यात आले. यापुढे गावात दरवर्षी स्वच्छता अभियानासह इतर विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. 

        - झुंजारराव मोहिते. 

(सदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान).