पालकमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेचे एका दाम्पत्याला घडले दर्शन

वडी-त्रिमली ता. खटाव जवळ दुचाकीवरून एक दाम्पत्य लहान मुलासह घसरून पडल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून त्यांनी स्वतः दाम्पत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच या अपघातात कोणी जखमी नसल्याची खात्री पटल्यानंतरच ना. पाटील पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

पालकमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेचे एका दाम्पत्याला घडले दर्शन
वडी-त्रिमली (खटाव) : अपघातग्रस्त दुचाकीवरील दाम्पत्याची आस्तेवाईकपणे चौकशी करताना सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील.

पालकमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेचे एका दाम्पत्याला घडले दर्शन 

अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे चौकशी : वडी-त्रिमली ता. खटाव जवळील घटना 

कराड/प्रतिनिधी : 
          महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या तत्परतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन दुचाकी अपघातातील एका दाम्पत्याला पहायला मिळाले. 
          मार्डी ता. माण या गावाकडे जाताना रविवारी 31 रोजी प्रवासादरम्यान रस्त्यावर एका लहान मुलासह दाम्पत्य दुचाकीवरून घसरून पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडी-त्रिमली ता. खटाव जवळ झालेल्या नवीन  रस्त्यावरून दुचाकी घसरून हा अपघात झाला होता. यामध्ये एका लहान मुलासह दाम्पत्य खाली पडलेल्याचे पाहून ना. बाळासाहेब पाटील यांनी वाहनांचा ताफा थांबवला. गाडीतून प्रथम खाली उतरून त्यांनी त्या लहान मुलासह दाम्पत्याची चौकाशी केली. तसेच कोणाला काही दुखापत झाली आहे का, याची देखील आस्थेवाईकपणे चौकशी केली. 

            यासंदर्भातील एक पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहे. सुदैवाने या किरकोळ अपघातात कोणालाही दुखापत झाली नव्हती. याची खात्री पटल्यानंतरच ना. बाळासाहेब पाटील हे पुढच्या प्रवासकडे मार्गस्थ झाले. दरम्यान, रस्त्यात गाड्यांचा ताफा थांबवून स्वतः सहकारमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीच आपली आस्थेवाईकपणे चौकशी केल्याने संबंधित दाम्पत्य काहीसे भारावून गेले होते.