सह्याद्रित कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी स्वतंत्र इमारतीची सोय

सह्याद्रित कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी स्वतंत्र इमारतीची सोय

कराड/प्रतिनिधी : 

           सातारा जिल्हा विशेषतः कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने कराड येथील सह्याद्रि हॉस्पिटलला कोविड 19 च्या लढ्यामध्ये सामील करून घेतले आहे. त्यानुसार सह्याद्रि हॉस्पिटल प्रशासनाकडून हॉस्पिटलच्या मुख्य इमारती व्यतिरिक्त एक स्वतंत्र इमारतच या रुग्णांसाठी समर्पित करण्यात आली असून याठिकाणी 50 बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कराडचे कामकाज प्रमुख डॉ. वेंकटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.