सैनिकी परंपरेचा कर्तबगार वारसदार, हिंगणगाव बु ॥ चा वैभव पवार

सैनिकी परंपरेचा कर्तबगार वारसदार, हिंगणगाव बु ॥ चा वैभव पवार

मल्हारपेठ प्रतिनिधी /विकास कदम 

कर्तुत्ववान वैभवची वैभव गाथा

पिता नामदेव माता लिलाबाई पोटी, जन्मला तो नर रक्षक.....
वैभवाने केला पवार कुळीचा उद्धार.....!
धन्य धन्य तो वस्ताद, गुरु संदीप दय्या व दादा जाबर.....
चेला तयाचा वैभव पवार, पठ्ठ्या खेळकर ......!!
अनेक त्या बहुमानी सुवर्णपदकांचा, तोच दावेदार.....
देश सेवेची हौस त्याला फार, जात वडार.....!!!
अती कणखर गडी भरदार शरीर पिळदार......
सैनिकांची संख्या असे जिथं फार......!!!!
तालुक्यात असे हिंगणगाव थोर...... 
हिंगणगाव बु ॥ गावचा हा सैनिकी वारसदार ....!!!!!!         

लहानपनापासूनच खेळाची खूप आवड असणाऱ्या वैभवची प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा हिंगणगाव बु ll नंन्तर १० पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय येते झाले. १० ची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॅग भरून तो मुंबईला कामानिमित्त गेला. तिथे हि दिवसरात्र काम केले. पण वैभव ने जिद्द नाही सोडली व्यायाम बंद न करता चालूच ठेवला. दहावीचा निकाल लागला आणि तो पास झाला हे कळताच त्याला खूप आनंद झाला, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने पुढील शिक्षण न घेता काम करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना सुद्धा तो सुट्टीच्या दिवशी कामावर जाऊन आई वडिलांना मदत करायचा. दिवसभर काम आणि सायंकाळी व्यायाम करायचा. सकाळी उठून धावायला जायचा. गावी असताना पै. उत्तम कदम (जाबर दादा )  वैभव ला मार्गदर्शन करायचे. खेळाबरोब त्याला भरतीचेही वेड होते. २०१४ मधे तो वयाच्या १९ व्या वर्षी भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा बल (BSF) जॉईन केले.

प्रशिक्षणसाठी तो चुडाचांदपूर ( मणिपूर) येते रुजू झाला. तेथे त्याची चपळाई, शरीरयष्टी, खेळाची आवड पाहून त्याला प्रशिक्षकांणी त्याची कुस्ती पुढे चालु राहावी म्हणून त्याला कुस्तीच्या NIC कोच श्री. संदीप दय्या यांनी वैभवला पुढील सरावासाठी चंदीगड येते पाटवलं. आणि त्याला एक नवी भरारी मिळाली. त्याने तितेही खूप मन लावून सराव केला. मेहनत घेतली. त्याचा पहिला २०१५ साली सामना पालोडा जम्मू येथे BSF सीमान्त मुख्यालय येथे झाला. त्या सामन्यात त्याला सुवर्ण पदक मिळाले त्यानंतर वैभवने ने अनिल मान (भारतीय कोचं ) दिल्ली यांच्या आखाड्यात सराव केला. त्यानंतर तो सलग २ वर्षे गांधीनगर (गुजरात), चंदीगड येते ही स्पर्धेत उतरला तिथे त्याने सुवर्ण व चांदीचे पदक, सन्मान चिन्ह मिळवली. २०१८ ला झालेल्या ऑल इंडिया पोलीस चॅम्पियनशिप मध्येही तो सहभागी झाला. या सामन्यात संपूर्ण देशातील पोलीस, सुरक्षा बले यांचे निवडक खेळाडू सहभाग घेतात. तिथे त्याची भेट ट्रीपल महाराष्ट्र केसर श्री. विजय चौधरी व पंजाब चे नामांकित मल्ल श्री. जस्सा पट्टी यांच्याशी झाली. तेही सहभागी होते. या दोन महान मल्लाचे ही त्याला मार्गदर्शन लाभले हे तो आवर्जून सांगतो.

कुस्ती क्षेत्रातील घोडदौड पाहून त्याची BSF. ने मुक्केबाजी साठी निवड केली आहे. त्याचा सराव तो सद्या छावला BSF कॅम्प दिल्ली येते बॉक्सिंग कोच  अशोक कुमार (सहाय्यक कमांडंर ) यांच्या मार्गदर्शना खाली करत आहे. शांत मनमिळाऊ स्वभावाचा वैभव गावी सुट्टीवर आल्यानंतर शांत न बसता फौजी मित्र व गावातील मित्र यांच्या सोबत सामाजिक कार्यात सहभागी होतो. भरती साठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना तो वयक्तिक क्रीडा प्रकारातून भरती होण्यासाठी मार्गदर्शन करतो. वृक्षारोपण करणे, गरजुंना मदत करण्यासाठी ही तो अग्रेसर असतो. तो गावासह भागात ही पैलवान फौजी म्हणून प्रसिद्ध आहे. आस आहे खेडेगावातून भरती झालेल्या हिंगणगाव बु ॥ गावचा हा सैनिकी वारसदार वैभव पवार.