समाजाला चांगली दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे - अँड. उदयसिंह पाटील

शिक्षक विद्यचे दान करण्याचे महान काम करतात, ते वंदनीय आहे. आज लोकशाहीमध्येच लोकशाहीचा विकृतपणे वापर होत असून ही विकृती समाजात दुही माजवण्याचे काम करत आहे. त्यामुळे समाजाला चांगली दिशा देण्यासाठी भविष्यात शिक्षकांनी समाज संरक्षणाचेही काम करावे.

समाजाला चांगली दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे - अँड. उदयसिंह पाटील
कराड : स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करताना अँड. उदयसिंह पाटील व अन्य मान्यवर

समाजाला चांगली दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे - अँड. उदयसिंह पाटील 

स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न 

कराड/प्रतिनिधी : 

        शिक्षक विद्यचे दान करण्याचे महान काम करतात, ते वंदनीय आहे. आज लोकशाहीमध्येच लोकशाहीचा विकृतपणे वापर होत असून ही विकृती समाजात दुही माजवण्याचे काम करत आहे. त्यामुळे समाजाला चांगली दिशा देण्यासाठी भविष्यात शिक्षकांनी समाज संरक्षणाचेही काम करावे, असे मत जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले. 

       येथील बचत भवनच्या सभागृहात कराड पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रमुख वक्ते प्राचार्य गणपतराव कणसे, तसेच कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण कमिटी सदस्या विनिता पलंगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सुरेखा जाधव, सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, शरद पोळ, काशीनाथ कारंडे, नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, शिक्षण विस्ताराधिकारी जमीला मुलाणी, रमेश कांबळे, संमती देशमाने, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट आदींची उपस्थिती होती.

      व्याख्याते प्राचार्य गणपतराव कणसे म्हणाले, शिक्षकांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्या कामात आनंद शोधणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राचा गेली काही वर्षांपासून अवघड वाटेतून प्रवास सुरु आहे. शाळा बंद असूनही विध्यार्थी पास होत आहेत. त्यमुळे ही तरुण पिढी आपण कुठे घेऊन जाणार आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण खरेच विध्यार्थी घेत आहेत का? याचाही गामभिर्याने विचार व्हायला हवा. केवळ पाठपुस्तक म्हणजे शिक्षण नसून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी व्यायचे असेल तर, त्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन ज्ञानकण शोधावे लागतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

      अध्यक्षीय भाषणात मानसिंगराव जगदाळे म्हणाले, शिक्षणावर जेवढा खर्च होतो, तेवढा इतर कोणत्याही बाबीवर होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख आहेत. कोरोनामुळे गेली दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे  विद्यार्थी मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेत असून शिक्षकांचेही उत्कृष्ट काम सुरू आहे. हल्लीचे युग मोबाईल, संगणकाचे युग असल्याने संगणकाच्या रूपाने उद्याच्या भावी पिढ्या सुसंस्कृत घडल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी पुरस्कार रूपाने सन्मान झाला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

       दरम्यान, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, प.स.सदस्य रमेश चव्हाण, जि.प.सदस्या विनिता पलंगे यांची भाषणे झाली. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने हणमंत काटे, विक्रम पाटील, माधवी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

      यावेळी अंध विध्यार्थीनी ज्योती पंडित मोहिते हिने एनएमएमएस परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चोवीस केंद्र व आठ इतर अशा एकूण बत्तीस शिक्षकांना तालुकास्तरीय स्व. यशवंतरावजी चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत आघाव व वैशाली रोकडे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे यांनी मानले केले. 

 

यशवंत पॅटर्नचा शुभारंभ 

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कराड पंचायत समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पूरक असा यशवंत पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. त्याचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन व्हिडिओसह चाचणी सोडवता येणार आहे.