सामान्य नागरिकांसाठी कराडात मोफत 25 बेड

विक्रम पावसकर मित्र परिवारातर्फे भाजपच्या सहकार्यातून कराड येथे मोफत कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून येथे सामान्य नागरिकांना 25 बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये सहा ऑक्सिजन बेडचाही समावेश असून नगरपालिका कर्मचारी, पोलिसांसह पत्रकारांनाही याठिकाणी प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.

सामान्य नागरिकांसाठी कराडात मोफत 25 बेड
भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर

भाजप, विक्रम पावसकर व मित्र परिवाराचा उपक्रम : पालिका कर्मचारी, पोलिस व पत्रकारांसाठीही दोन बेड राखीव 

कराड/प्रतिनिधी :

     विक्रम पावसकर मित्र परिवारातर्फे भाजपच्या सहकार्यातून कराड येथे मोफत कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून येथे सामान्य नागरिकांना 25 बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये सहा ऑक्सिजन बेडचाही समावेश असून नगरपालिका कर्मचारी, पोलिसांसह पत्रकारांनाही याठिकाणी प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.

    येथील टिळक हायस्कूलमध्ये लवकरच हे 25 बेडचे मोफत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी 12 रोजीपासून हे सेंटर प्रत्यक्ष सुरु होईल, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कराडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून बेडअभावी रुग्णांचे हाल होत आहे. अनेकांना केवळ वेळेवर बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या कराड शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कराडमधील कोविड हॉस्पिटलमध्ये बेड,व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. परिणामी, रुग्णांची हेळसांड होत असून शहरासह तालुक्यातील ही बिकट स्थिती लक्षात घेता सामान्य नागरिकांसाठी टिळक हायस्कूलमध्ये हे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

    या कोरोना केअर सेंटरमध्ये विना मोबदला रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून त्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची मदत घेण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये एकूण 25 बेड असून त्यामध्ये सहा ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे.  नगरपालिका कर्मचारी, पोलिसांसह पत्रकारांनाही यातील प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या रुग्णांना बेडची आवश्यकता भासेल, त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी या कोरोना सेंटरमधील बेडसाठी अजय पावसकर (मो. ७०२०३३८८५६, ८०८७२६१५७१) व एकनाथ बागडी (मो. ९८२२४४९४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पावसकर यांनी यावेळी केले आहे. 

 

*पावसकर कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी* 

कोणत्याही संकटकाळात येथील पावसकर कुटुंबियांनी सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. मग तो महापूर असो वा पूरग्रस्त, स्थलांतरित झोपडपट्टीवासीय, अतिवृष्टीच्या काळात महामार्गावर अडकलेल्या ट्रक चालकांनाही त्यांनी मोलाची मदत केली आहे. तसेच कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन, संचारबंदी व जिल्हाबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारची मदत केली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव व विसर्जन काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी भाविकांना मूर्ती घरपोच देणे व त्या विसर्जित करण्यासाठीही विक्रम पावसकर व मित्र परिवाराने महत्वपूर्ण कार्य केले आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या व बेडचा अभाव पाहता सामान्य नागरिकांसाठी त्यांनी कराडात मोफत 25 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.