उंब्रज मध्ये किराणा दुकानदारांची चांदी,जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले

उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेत किराणा दुकानदारांची चांदी सुरू असून गरजेच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. पुरवठा विभाग,अन्नभेसळ,ग्रामपंचायत प्रशासन तोंडावर बोट ठेऊन शांत बसले असल्याने गोर गरिबांना कोणी वाली आहे का?असा टाहो जनतेतून फोडला जात आहे.

उंब्रज मध्ये किराणा दुकानदारांची चांदी,जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेत किराणा दुकानदारांची चांदी सुरू असून गरजेच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. पुरवठा विभाग,अन्नभेसळ,ग्रामपंचायत प्रशासन तोंडावर बोट ठेऊन शांत बसले असल्याने गोर गरिबांना कोणी वाली आहे का?असा टाहो जनतेतून फोडला जात आहे.

तेल,साखर,गहु,तांदूळ ज्वारी यांच्या किमती संचारबंदी च्या काळात भरमसाठ वाढल्याने गोरगरीब जनता भरडली जात आहे.एकतर रोजगार नाही त्यात महागाई अशा दुहेरी कात्रीत जनता सापडली आहे .

जिल्हाधिकारी यांच्या आदेशांर उंब्रज ग्रामपंचायतच्या  समितीची स्थापना झाली असल्याची माहिती मिळत असून ही समिती अद्याप गावपातळीवर कार्यरत झाली नसल्याची चर्चा आहे उंब्रजचे ग्रामसेवक कागदी घोडे रंगवण्यात मश्गुल असून ग्रामपंचायत प्रशासन नावापुरते काम करीत असल्याची चर्चा आहे.गाव समितीचे अध्यक्ष पद गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्याकडे असून उपाध्यक्ष पद गावकामगार तलाठी यांच्याकडे आहे.

दरवाढी बाबत तातडीने अंमलबजावणी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी उंब्रज पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने होत आहे.