दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री

गुन्हेगारांचा कर्दनकाळ सांगली पोलीस दलात,आता गुन्हेगारांची खैर नाही; सांगली पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री

दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री

दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री

गुन्हेगारांचा कर्दनकाळ सांगली पोलीस दलात

आता गुन्हेगारांची खैर नाही; सांगली पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री


सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच बोकाळलेली आहे. एमआयडीसी एरिया, खाजगी सावकारी ,ऊस शेती यामुळे या भागातील लोकांच्या हातात चांगला पैसा खळखळू लागला आहे.दिवसाढवळ्या खून,दरोडे,मारामारी हप्तेवसुली,अवैध व्यवसाय,कंपन्यांमधील कामांवरुन, जमीन खरेदी विक्रीवरुन या भागात नेहमी वाद होत असतात. भाई-दादांची संख्या या भागांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नूतन पोलीस अधीक्षक यांनी चार्ज घेतल्यानंतर कारवाईचा धडाका सुरु केला त्यामुळे भाई-दादांची बोबडी वळली आहे. अशातच आता मुंबई पोलीस दलातील आणखी एका दबंग अधिकाऱ्याची सांगली जिल्हा पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे या भागातील भाई-दादांची पुरती वाट लागणार असल्याचं बोललं जातंय.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांंची नेमणूक सध्या मुंबई पोलीस दलात असून नुकत्याच झालेल्या विनंती बदल्यांच्या गॅझेटमध्ये देवकर यांची सांगली पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून विनंती बदली झालेली आहे.भरदार शरीरयष्टी आणि ताडमाड उंची लाभलेले पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे कडक शिस्तीचे खमक्या अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत.अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास लीलया करणारे अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे देवकर कायदा सुव्यवस्था राबविण्यात अतिशय कर्तव्यनिष्ठ असल्याची ख्याती राज्य पोलीस दलात आहे.आजअखेर त्यांनी मुंबई,पुणे,सोलापूर,सातारा या ठिकाणच्या विविध पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.

नामचीन गुंडांना वठणीवर आणण्यात हातखंडा असणारे देवकर आपल्या कामामुळे पोलीस दलात परिचित आहेत.आपल्या पोलीस सेवेच्या कार्यकाळात अनेक गुंडांना गजाआड पाठवणारे अधिकारी सांगली जिल्ह्याला लाभले असल्याने बऱ्याच अंशी गुन्हेगारीवर अंकुश बसणार आहे.कुख्यात तस्कर विरप्पन यांच्या साम्राज्यात कारवाई साठी जाणारे अधिकारी म्हणून अरुण देवकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते ज्याकाळी विरप्पन चे भय संपुर्ण दक्षिण भारतात होते त्या काळात अत्यंत धाडसाने एका ऑपरेशन मध्ये अरुण देवकर यांचा समावेश होता आणि कारवाईसाठी विरप्पनच्या च्या जंगलात जाण्याचा प्रसंग देवकर यांच्यावर आला होता.यावेळी आपली कारवाई पार पाडत सहीसलामत जंगलातून बाहेर येण्याचा पराक्रम पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पार पाडला होता.

 

१ इनकाउन्टर आणि १४ दरोडे उघड

पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी २००७ साली सराफी दुकानांवर दरोडे रोखण्यासाठी एक सक्षम टीम नेमली होती या मध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा समावेश होता यामध्ये सराफी दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या नांगरे गॅंगची पाळेमुळे उकडून टाकत ८ किलो सोने हस्तगत केले होते तर यामध्ये एका पळून जाणाऱ्या व पोलीस टीमवर हल्ला करणाऱ्या एका दरोडेखोराचा इनकाउन्टर झाला होता.या कामगिरीच्या अनुभवाचा उपयोग निश्चितच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेमणुकीमुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी होणार आहे.

यामुळे सांगली जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर याची एंट्री म्हणजे गुन्हेगारांना एक प्रकारचा अलर्ट असून उलटसुलट काम करणाऱ्या भाई दादांना हा एक प्रकारचा इशारा असल्याची चर्चा सांगली पोलीस दलात आहे.

 

 

लाचलुचपत डीवायएसपी म्हणून 'सिंघम' कामगिरी

पुणे,औरंगाबाद,बीड,सोलापूर येथे लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून अरुण देवकर कार्यरत असताना सिंघम कामगिरी करत १५० पेक्षा जास्त कारवायांमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती यामध्ये सरकारी नोकरीतील क्लास १ व क्लास २ अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील अनेक कारवाया गाजल्या होत्या.काही नामांकित अधिकारी व कर्मचारी अरुण देवकर यांच्या कार्यकाळात कारवाईच्या कचाट्यात सापडले होते.यामुळे कायदा सुव्यवस्था राबविण्यात कर्तव्यदक्ष असणारे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची सांगली पोलीस दलातील बदली म्हणजे गुन्हेगारांना एकप्रकारचा अलर्ट असल्याची चर्चा आहे.