दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांना न्यायालयाची 'क्लीनचिट'

गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणारे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे वरील बोगस आरोपातून दोषमुक्त

दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांना न्यायालयाची 'क्लीनचिट'

दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांना न्यायालयाची 'क्लीनचिट'

गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणारे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे वरील बोगस आरोपातून दोषमुक्त

सांगली/ब्युरो चीफ

आटपाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सांगली जिल्हा पोलीस दलातील दबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांच्या विरुद्ध सांगली पोलिसांनी दाखल केलेल्या केसला न्यायालयाने दणका दिला असून निरीक्षक देवकर यांच्या विरोधात केलेली कारवाई चुकीची ठरवली आहे.

सांगली जिल्हा पोलिसांनी आटपाडीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यावर अवैध मानवी वाहतुकीचा दाखल केलेला गुन्हा जिल्हा न्यायालयाने चुकीचा ठरवून त्यांच्यासह अन्य एका व्यक्तीला या खटल्यातून वगळण्याचा आदेश दिला आहे.जानेवारी महिन्यामध्ये कर्नाळ रोडवरील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई करून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना  मित्रासह ग्राहक म्हणून अटक केल्याचे म्हटले होते. यामध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तीसह सहा जणांच्या वर अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे म्हटले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सदरची कारवाई चुकीची असल्याचे सांगून न्यायलयाने त्यांची पोलीस कस्टडी नाकारली होती. तरीही त्यांचे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी देवकर यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागून संबंधित प्रकरणात आपल्यावर चुकीची कारवाई झाली असल्याचे म्हटले होते. न्यायालयासमोर देवकर आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडल्यानंतर नुकताच न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून त्यामध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला या गुन्ह्यात आरोपी करता येणार नाही असे स्पष्ट करून दोषारोपपत्र नाकारले आहे.


    दरम्यान पोलीस निरीक्षक देवकर यांच्यावर केलेली कारवाई ही पोलिसातील अंतर्गत वादातून झाले असल्याचा आरोप यापूर्वीच आटपाडी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र पोलिसांनी आपल्या कारवाईचे समर्थन केले होते. आता न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सांगली जिल्हा पोलिस दलात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आपल्या खात्यातील एका कर्तव्यदक्ष आणि दबंग अधिकाऱ्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यामागे नेमके काहीतरी षड्यंत्र असल्याची प्रथमपासून चर्चा होती. न्यायालयाचे निकालाने ते सिद्ध झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाळू सम्राटांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरीस आणणारे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सांगली पोलिसांनी चुकीच्या गुन्ह्यात अडकवले असल्याच्या तीव्र भावना जनमानसात उसळल्या होत्या अनेक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यावर दाखल केलेल्या चुकीच्या गुन्ह्याबाबत निवेदने दिली होती.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे भरदार शरीरयष्टी आणि ताडमाड उंची लाभलेले कडक शिस्तीचे खमक्या अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत.अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास लीलया करणारे अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे देवकर कायदा सुव्यवस्था राबविण्यात अतिशय कर्तव्यनिष्ठ असल्याची ख्याती राज्य पोलीस दलात आहे.आजअखेर त्यांनी मुंबई,पुणे,सोलापूर,सातारा, नागपूर या ठिकाणच्या विविध पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.परंतु पोलीस दलातील खमक्या अधिकारी म्हणून बिरुदावली असणारे देवकर सांगली पोलीस दलातील वरिष्ठांच्या चुकीच्या कार्यशैलीचे बळी ठरले असल्याचे न्यायालयाच्या आदेशाने उघड झाले आहे.नामचीन गुंडांना वठणीवर आणण्यात हातखंडा असणारे देवकर आपल्या कामामुळे पोलीस दलात परिचित आहेत. त्यांनी त्यांचे सेवाकालावधीत जास्त काळ गुन्हे शाखेत काम केले आहे.

१ इनकाउन्टर आणि १४ दरोडे उघड

पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी २००७ साली सराफी दुकानांवर दरोडे रोखण्यासाठी एक सक्षम टीम नेमली होती या मध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा समावेश होता यामध्ये सराफी दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या नांगरे गॅंगची पाळेमुळे उकडून टाकत ८ किलो सोने हस्तगत केले होते तर यामध्ये  दरोडेखोरनी पोलीस टीमवर हल्ला केला होता त्यावेळी चकमक झाली होती त्यात  एका दरोडेखोराचा इनकाउन्टर झाला होता.

यामुळे सांगली जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर याची एंट्री म्हणजे गुन्हेगारांना एक प्रकारचा अलर्ट दिला गेला होता उलटसुलट काम करणाऱ्या भाई दादांना हा एक प्रकारचा इशारा असल्याची चर्चा सांगली पोलीस दलात पसरली होती.परंतु एका चुकीच्या आरोपाने देवकर यांना गेली आठ महिने अनंत यातना भोगाव्या लागल्या आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी गेल्या वीस वर्षातील पोलीस दलातील तपश्चर्या पणाला लागली होती. परंतु न्यायालयात सत्याचा विजय होऊन त्यांना दोषमुक्त करण्यात आले.

लाचलुचपत डीवायएसपी म्हणून 'सिंघम' कामगिरी

पुणे,औरंगाबाद,बीड,सोलापूर येथे लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून अरुण देवकर कार्यरत असताना सिंघम कामगिरी करत १५० पेक्षा जास्त कारवायांमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती यामध्ये सरकारी नोकरीतील क्लास १ व क्लास २ अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील अनेक कारवाया गाजल्या होत्या.काही नामांकित अधिकारी व कर्मचारी अरुण देवकर यांच्या कार्यकाळात कारवाईच्या कचाट्यात सापडले होते. याच कारवायामुळे त्यांचे विरुद्ध हे षड्यंत्र रचल्याचे बोलले जात आहे.


जानेवारी २०२१ च्या मध्यावर सांगली पोलिसांनी माझ्याविरुद्ध PITA कायद्याच्या कलम ५ अंतर्गत दुर्भावनापूर्ण बनावट FIR नोंदवली होती. आणि पुढे कोणताही पुरावा नसतानाही न्यायालयात बनावट आरोपपत्र दाखल केले.त्यानंतर जेएमएफसीने "इश्यू प्रोसेस ऑर्डर" जारी केला त्यानंतर मी माननीय सत्र न्यायालयात अपील केले. माझे अपील ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने टिप्पणी केली की माझ्याविरुद्ध कोणताही गुन्हा नाही आणि "इश्यू प्रोसेस ऑर्डर" (आरोपपत्र)   27 ऑगस्ट 2021 रोजी Quashed and Set-aside केले आहे.अशा लाजिरवाण्या आणि क्लेशकारक परिस्थितीमध्ये मला खूप शारीरिक, मानसिक, आर्थिक सामाजिक ताण सहन करावा लागला.पण शेवटी सत्याचा नेहमीच विजय होतो आणि शेवटी माननीय न्यायालयाने मला न्याय दिला.मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या हृदयापासून माझ्या सर्व जवळच्या प्रियजनांना धन्यवाद देतो जे अशा वेदनादायक परिस्थितीत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले.


अरुण देवकर

पोलीस निरीक्षक,महाराष्ट्र पोलीस