सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती बाबत आढावा बैठक संपन्न

सांगली / प्रतिनिधी

सांगली येथे शनिवार दि.२० रोजी पूरपरिस्थिती बद्दल सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण, खा श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या मिटिंग ला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.  

या मीटिंगमध्ये जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव श्री नंदकुमार वडनेरे यांनी त्यांच्या वडनेरे समितीच्या अहवालाचे सादरीकरण यावेळी केले.