राष्ट्रीय कर्फ्यू आवश्यक 

उद्या रविवारी देशातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सक्तीच्या सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. लोकांचा प्रवास, संपर्क एक दिवस पूर्णपणे बंद झाल्यामुळे कोरोनाची लागण थांबण्याची शक्यता आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राष्ट्रीय संचारबंदी (जनता कर्फ्यू ) रविवारी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत लागू केला आहे. सरकारच्या या आरोग्य आणीबाणीच्या आयोजनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.                                                       

राष्ट्रीय कर्फ्यू आवश्यक 

संपादकीय / अग्रलेख 
           महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली आहे. जगातील १७६ देशांत कोरोनाचा फैलाव झाला असल्यामुळे अमेरिका, इंग्लंड, स्पेन, रशिया,भारत, इटली, चीनसारखी राष्ट्रे कोरोनाबद्दल जागरूक असून लोकांना स्वच्छतेचे आवाहन करत आहेत. चीनमधील वूहान शहरातून जगभर कोरोना विषाणूची साथ पसरली आहे. कोरोनामुळे जगात आजपर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या आठ हजाराकडे गेली आहे. भारतात आजपर्यंत कोरोनामुळे पाचजण मृत्यू पावले आहेत. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबद्दल नागरिकांत भीतीचे वतावरण पसरले आहे. कोरोनाची लागण झालेल्यापैकी मृत्यू होणार्यांची टक्केवारी फक्त दोन टक्के आहे. म्हणजेच ९८ जण बरे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे परंतु भीती बाळगू नये, असे सरकारने आवाहन केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर इ. शहरांत लोकांची गर्दी सर्वत्र असते. लोकल ट्रेनमध्ये ओकांची खूपच गर्दी असते, या गर्दीत कोरोनाबाधित रुग्ण असेलतर कितीतरी जणांना त्यापासून कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच परदेशातून आलेल्या भारतीयांची तपासणी करणे गरजेचे आहे. ते कोरोना पाॅझीटीव्ह असतील तर त्यांच्यावर उपचार करणे शक्य असते, परंतु काहीजण कोरोनाची लागण झाल्यानंतर पळून गेलेले रुग्ण आहेत, तेच समाजाला घातक आहेत. अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. गावोगावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने शाळा, बसेस, ट्रेन, खसगी कार्यालये बंद करण्याचा व सरकारी कार्यालये पन्नास टक्के सुरु ठेवण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. भारताची सीमा बंद केली आहे. विमान उड्डाणे बंद आहेत. एवढी सर्व काळजी घेतल्यामुळे भारतात कोरोनाची लागण झालेले रुग्ण कमी आहेत. भारतात कोरोनाची दुसरी स्टेज सुरु असल्यामुळे सरकार युद्ध पातळीवर काळजी घेत आहे. उद्या रविवारी देशातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सक्तीच्या सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. लोकांचा प्रवास, संपर्क एक दिवस पूर्णपणे बंद झाल्यामुळे कोरोनाची लागण थांबण्याची शक्यता आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राष्ट्रीय संचारबंदी (जनता कर्फ्यू ) रविवारी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत लागू केला आहे. सरकारच्या या आरोग्य आणीबाणीच्या आयोजनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.                                                                                                             महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला आहे. सार्वजनिक गर्दीची जी स्थळे आहेत, तेथील गर्दी कमी करणे, राज्यातील सार्वजनिक वाहतूक विरळ करणे, कार्यालयांना पन्नास टक्के उपस्थिती करणे, मॉल्स- थिएटर्स बंद ठेवणे, कार्यक्रम- लग्न समारंभ रद्द करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, आठवडी बाजार बंद करणे, मद्य विक्री बंद करणे असे काही धाडसी निर्णय घेतले आहेत. ते स्तुत्यच आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होईल. तसेच लोकांमध्ये कोरोना विषाणू पसरणार नाहीत. रविवारच्या जनता कर्फ्यूमध्ये देशातील सर्व नागरिकांनी सहभागी झाल्यास कोरोनाची लागण होण्याची साखळी तुटणार आहे. तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार आयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा असेही आवाहन अजित पवार यांनी केले आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावे लागेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच ३१ मार्च नाही तर पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिले पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.                                                                           कोरोनासाठी केंद्राला सध्या निधी मागण्याचा विचार राज्य सरकारचा नाही. करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी आहे. लोकांनी गर्दी करणे टाळावे. सरकारच्या या निर्णयामुळे काही कंपन्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. परंतु जैविक हानी होण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडू शकते. कंपन्यांनी या आरोग्य आणीबाणीत सहकार्य करण्याचे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. देशात कोरोनाचा फैलाव जास्त रामानात होत आहे. कोरोनाची दुसरी स्टेज असल्याने सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी घेतली तर कोरोनावर नागरिक मात करू शकतात. तसेच दि. २२ मार्च रोजी रविवारी होणार्या राष्ट्रीय कर्फ्युला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, यामुळे कोरोनाची साखळी तुटून कोरोना आटोक्यात येईल. केंद्र व राज्य सरकारने केलेले केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे म्हणता येईल.