सर्वसमान्य लोक हीच आमची संपत्ती - राजेंद्रसिंह यादव

सर्वसमान्य लोक हीच आमची संपत्ती - राजेंद्रसिंह यादव

कराड/प्रतिनिधी :

                       सर्वस,अन्य जनतेच्या हितासाठी झटणे हे आमचे उदिष्ट असून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यावर आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. कोणत्याही परिस्थितीत लढणे, संघर्ष करणे आमच्या रक्ततात आहे. त्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींवर मतकरून आव्हानात्मक गोष्टींचा सामना करीत आम्ही आमचा मित्र परिवार निर्माण केला आहेहीच आमच्या जीवनातील खरी संपत्ती असून सर्वसमान्य लोक हीच आमची संपत्ती असल्याचे प्रतिपादन कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केले.

                       येथील हेड पोस्टाजवळ शुक्रवारी 27 रोजी सायंकाळी आयोजित राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त  आयोजित युवामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पैलवान राहुल आवारेजिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनिल काटकरनगर पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार,नियोजन सभापती विजय वाटेगावकरआरोग्य सभापती गजेंद्र कांबळेमहिला व बालकल्याण सभापती  स्मिता हुलवानपाणीपुरवठा व  जलनिस्सारण सभापती अर्चना ढेकळेनगरसेविका आशा मुळेप्रियांका यादवनगरसेवक बाळासाहेब यादवविजयसिंह यादव,  माजी उपाध्यक्ष सुभाष उर्फ बंडा डुबलपैलवान आनंदराव मोहिते,  रयत संघटनेचे सचिन नलवडे, विजयसिंह यादव, बापू देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते