शेतकऱ्याचं पोर अजिंक्यताऱ्याच डायरेक्टर

रामकृष्णनगर येथील शिवाजी काळभोर यांची वर्णी

शेतकऱ्याचं पोर अजिंक्यताऱ्याच डायरेक्टर

उंब्रज/अनिल कदम


अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जावली मतदार संघाचे आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी बिनविरोध झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदी रामकृष्णनगर येथील प्रगतशील शेतकरी आणि युवा नेतृत्व शिवाजी काळभोर यांची एकमताने निवड केली आहे.यामुळे युवकांच्या हातात नव्याने राजकीय ताकत देताना एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला उमेदवारी दिली आणि संचालक पद बिनविरोध दिल्याने रामकृष्णनगरसह काशीळ,अतीत परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तर शेतकऱ्याचं पोर अजिंक्यताऱ्याच डायरेक्टर झाल्याने परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे . सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या विचारांनी वाटचाल करणारा अजिंक्यतारा सहकारी साखर करण्याची निवडणूक बिनविरोध होऊन सहकारात एक आदर्श निर्माण झाला आहे.

काशीळ व निसराळे फाट्याच्या मध्यावर असणाऱ्या रामकृष्णनगर गावातील होतकरू आणि निष्ठावंत युवा कार्यकर्ते शिवाजी काळभोर यांनी आपली श्रद्धा कायमच आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या चरणी अर्पण केली आहे.यामुळे अतिशय तरुणवयात बाबा महाराजांनी विश्वासाने कारखान्याची संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे.यामुळे ऊस उत्पादक सभासदांना न्याय देण्याबरोबरच वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यावर शिवाजी काळभोर यांना भर द्यावा लागणार आहे.तसेच परिसराचा चौफेर विकास साधण्यासाठी कायमच दक्ष राहून काम करावे लागणार आहे.कृष्णा,उरमोडी नदीच्या पात्रामुळे परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.स्वर्गीय माजी मंत्री अभयसिंह राजे भोसले यांच्या स्वप्नातील काशीळ परिसरात  बाबराजेंच्या साथीने नंदनवन करण्याची मोठी जबाबदारी शिवाजी काळभोर यांना मिळाली आहे.

स्वर्गीय माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्या आदर्श विचारवर वाटचाल करीत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संचालक म्हणून दिलेल्या संधीचा परिसराचा चौफेर विकास करण्यासाठी उपयोग करणार आहे.कारखानाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे.बाबा महाराजांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे

शिवाजी काळभोर

संचालक,अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना