बोरगावचे सपोनि चंद्रकांत माळी यांची उचलबांगडी,डॉ सागर वाघ यांची नियुक्ती

बोरगावचे सपोनि चंद्रकांत माळी यांची उचलबांगडी,डॉ सागर वाघ यांची नियुक्ती

बोरगावचे सपोनि चंद्रकांत माळी यांची उचलबांगडी,डॉ सागर वाघ यांची नियुक्ती

सातारा/प्रतिनिधी

बोरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांची सातारा नियंत्रण कक्षात अचानक बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी चंद्रकांत माळी हे गेले काही दिवस बोरगाव पोलीस ठाण्यात प्रभारी
अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र,दरम्यानच्या काळात बोरगाव पोलीस ठाण्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आल्या होत्या. त्यापैकी काही तक्रारींची चौकशी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे करत होते.

एका सागवान गाडीच्या प्रकरणाची चौकशी समीर शेख यांच्याकडेच सुरु होती. त्या चौकशीअंती बोरगाव पोलिसांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याने चंद्रकांत माळी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर त्यांच्याजागी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांची नियुक्ती
करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी रात्री दिले.