सातारा जिल्हा २५ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी शाहू स्टेडियमवर

विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची तयारी

सातारा जिल्हा २५ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी शाहू स्टेडियमवर

सातारा जिल्हा २५ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी शाहू स्टेडियमवर

विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची तयारी

सातारा / प्रतिनिधी

विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यातील २५ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे . 

सातारा जिल्ह्यातील २५ वर्षा खालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी मंगळवार,दि.१६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.निवड चाचणी मध्ये भाग घेऊ इच्छित असणाऱ्या पात्र खेळाडूंनी  सकाळी ८.३० वा.सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर निवड चाचणीसाठी स्वतःच्या किटसहित ,क्रिकेट गणवेशात, आधार कार्ड,जन्मदाखलाच्या पुराव्यासहीत हजर राहावे.असे आवाहन सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.