आता प्रशासकाची निवड पालकमंत्र्यांच्या हातात...!

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे निकष व कार्यपध्दती निक्षित करण्याबाबत अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना

आता प्रशासकाची निवड पालकमंत्र्यांच्या हातात...!

उंब्रज/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सदरचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे,शासन परिपत्रक क्रमांक ग्रापनि २०२०/प्र.क्र.२६/पं.रा.-२बांधकाम भवन,नुसार १४ जुलै, २०२० संदर्भ: १. महाराष्ट्र शासन राजपत्र सन २०२० चा अध्यादेश क्र.१०, दिनांक २५ जून,२०२०.२. ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्रापंनि २०२०/प्र.क्र.२६ /पं.रा.-२, दिनांक १३ जुलै. २०२०,प्रस्तावना:संदर्भ क्र. १ अन्वये, सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१०, दिनांक २७ जून, २०२० अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतींच्या निवडणूका घेणे शक्य नसलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोट-कलम १ मध्ये, खंड (क) मध्ये तरतुद करण्यात आली
आहे.

तसेच, संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या निवडीसाठी निकष व कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.शासन परिपत्रक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती संबंधित जिल्हयांचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करण्यापुर्वी पुढील बाबी मा.पालकमंत्री यांच्या निर्दशनास आणून देणे आवश्यक राहील 

१. प्रशासक म्हणून ज्या व्यक्तीची निवड करण्यात येईल अशी व्यक्ती त्या गावचा रहिवाशी व त्या
गावच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे आवश्यक राहील.

२. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार
नाही.

३. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार जे अधिकार, कर्तव्य सरपंचास प्राप्त होते ते
अधिकार व कर्तव्य प्रशासक म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस प्राप्त होतील.

४. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती प्रशासक पदाच्या कालावधीत संबंधित
ग्रामपंचायतीच्या सरपंचास अनुज्ञेय असलेले मानधन व इतर भत्ते आहरीत करेल,

५. प्रशासक नियुक्ती ही पर्यायी व्यवस्था असल्यामुळे प्रशासकाचे पद कोणत्याही प्रवर्गासाठी
राखीव ठेवता येणार नाही.

६. ज्या दिवशी विधिग्राहयरित्या गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून
प्रशासक पद व अधिकार तात्काळ संपुष्टात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सदरचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे,

२५ ऑगस्ट २०२० रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

अंबवडे,भोळेवाडी,गमेवाडी,घोगाव,गोटेवाडी, हणबरवाडी, हरपळवाडी, इंदोली, जिंती ,कार्वे ,काले, खालकरवाडी ,कोरेगाव ,मालखेड ,म्होप्रे,मौजे साकुर्डी, मुंडे, रिसवड, शेळकेवाडी(म्हासोली), शेनोली, शेरे, शिंदेवाडी (विंग), सुर्ली, तासवडे, उंडाळे, विरवडे, वडगाव (उंब्रज), वहागाव, वाठार, विंग, अकाईचीवाडी, बनवडी, बेलवडे बुद्रुक, बेलदरे, बेलवडे-हवेली, भुरभुशी, चौगुले मळा(भैरवनाथ नगर),गायकवाडवाडी, घारेवाडी ,घोणशी, गोवारे, खराडे, कोळे ,लटकेवाडी, मरळी, नांदलापूर, पाचुंद,पाडळी-केसे, पाल, पेरले, पोतले,सवादे, शेवाळेवाडी (म्हासोली), शिरवडे, शिवडे, टाळगाव, वस्ती साकुर्डी, वाघेरी, वाघेश्वर, वारुंजी, येरावळे, गोटे.

२७ ऑगस्ट २०२० रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती
 
निगडी, पार्ले, अबईचीवाडी, बामणवाडी,भरेवाडी भवानवाडी,भुयाचीवाडी,चचेगाव,चिखली,चोरे, धोंडेवाडी, गोळेश्वर ,कालवडे कामथी, करवडी, केसे, खोडशी खोडजाईवाडी, खुबी, किरपे, कोडोली, महारुगडेवाडी, म्हासोली, नांदगाव, नवीन कवठे ,सैदापूर, साजुर, साळशिरंबे,शहापूर ,शेवाळवाडी (उंडाळे),वडोली निळेश्वर वराडे, वसंतगड, येणके.

२३ सप्टेंबर२०२० रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

हजारमाची


१०/११ नोव्हेंबर २०२० रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

जखीणवाडी
कोपर्डे-हवेली
शिरगाव
तांबवे
उंब्रज