स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा वाळू चोरांना दणका, धोम येथील घटना, २५ लाख १२ हजारांचा  मुद्दे माल जप्त 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा वाळू चोरांना दणका, धोम येथील घटना, २५ लाख १२ हजारांचा  मुद्दे माल जप्त 

सातारा / प्रतिनिधी 

धोम ता.वाई गावचे हद्दीत कृष्णा नदीपात्रात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर छापा टाकून ४ ब्रास वाळूसह २५ लाख १२ हजारांचा  मुद्दे माल ताब्यात घेऊन दोघा जणांवर पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई शनिवार दि.३० रोजी करण्यात आली. 

ह्दय लोकनाथ कश्यप (वय२४) रा.सह्याद्री नगर वाई,दिगंबर नारायण पवार (वय२१) रा.बावधन वाई अशी  गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी  दिलेली माहिती अशी की, 
धोम येथील कृष्णा नदीपात्रात चोरट्या वाळूचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील , यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतुक यांचेविरुध्द कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या,त्या अनुशंगाने एक पथक तयार करुन मिळालेल्या माहितीच्या  अनुषंगाने धोम गावचे हद्दीत कृष्णा नदी पात्रात छापा टाकला असता एका जे.सी.बी. च्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करुन डंपर मध्ये चोरटी वाहतुक करत असताना दोघे जण रंगेहाथ मिळुनआले. 
त्यांच्या ताब्यातील जे.सी.बी., डंपर क्र. एम.एच.११ सी.जे. ७३७२ व डंपरमध्ये भरलेली चार ब्रास वाळू असा सुमारे  २५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन  जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत 

पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ,सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे,सहाय्यक फौजदार विलास नागे, आनंदराव भोईटे, मोहन नाचन, संतोष जाधव,गणेश कापरे, वैभव सावंत, गणेश कचरे, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.