कोरोना सदृश साथीने नागरिक हैराण

प्रशासनाची हयगय,संपाची झळ पालकमंत्री मुंबईत

कोरोना सदृश साथीने नागरिक हैराण

उंब्रज / प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या कोरोना महामारीच्या कार्यकाळात जिल्ह्यात भेटींचे भिरकीट लावणारे तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि विद्यमान पालकमंत्री मुंबईत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची हयगय सुरू असून संपाची झळ आरोग्य विषयक सेवांसाठी नागरिकांना बसू लागली आहे कोरोना सदृश साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत घराघरात चार पाच रुग्ण कोरोना सदृश साथीने आजारी असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत यामुळे जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या कोरोना कालावधीतील कार्याची आठवण नागरिकांना होत असून शिंदे फडणवीस सरकार यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिली आहे.

गतवर्षी जून महिन्यात राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार इतिहास जमा झाले होते यानंतर शिवसेनेतील एका गटाने भाजप बरोबर संधान साधून सत्तेत वाटा मिळविला यावेळी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आ.एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली तर आ.शंभूराज देसाई यांना बढती मिळून जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर नियुक्ती मिळाली २०२० मध्ये मार्च महिन्यात आलेल्या कोरोना महामारीच्या कालखंडात तत्कालीन मुख्यमंत्री आ.उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे यांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याची चर्चा नागरिकांच्यात कायमच चर्चिली जात असते सध्या कोरोना सदृश साथीचा आजार बळावत चालला आहे यामुळे महाराष्ट्रात काही मृत्यू देखील झाल्याचे विद्यमान आरोग्यमंत्री आ.तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले आहे यातच शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी खाजगी दवाखान्यात महागड्या उपचारांवर अवलंबून राहावे लागणार आहे तर जिल्हा प्रशासन हातावर हात ठेवून शांत बसले असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे