सपोनि अजय गोरड यांना मुदतवाढ,जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

वाहतूक शाखेचे पो.नि.विठ्ठल शेलार यांची मसूर येथे बदली तर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव वाहतूक शाखेत बदली

सपोनि अजय गोरड यांना मुदतवाढ,जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

सातारा जिल्ह्यातील बावीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवार, दि. ११ रोजी सायंकाळी उशिरा झाल्या असून त्यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांचा समावेश आहे.तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची सातारा येथील जिल्हा वाहतूक शाखेत, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांची पाचगणी पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांची मेढा पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा येथील वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांची मसूर पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश गर्जे यांची भुईंज पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत  चौधरी यांची ढेबेवाडी पोलीस ठाणे प्रभारी, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांची तळबीड पोलीस ठाणे येथे प्रभारी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव यांची सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेत प्रभारी,ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांची सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांची सातारा येथील मानवी संसाधन पोलीस कल्याण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना उंब्रज पोलीस ठाणे येथे मुदतवाढ मिळाली आहे.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांची कराड शहर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांची शाहुपुरी पोलीस ठाणे, वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची बोरगाव पोलीस ठाणे येथे प्रभारी, मेढा पोलीस ठाण्याचे अमोल माने यांची सातारा येथील सायबर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांची फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, साताऱ्यातील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांची कराड शहर पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची पोलीस उपविभागीय कार्यालय वाई विभाग येथे वाचक, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांची सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत, सातारा येथील भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांची सातारा तालुका पोलीस ठाणे आणि सातारा येथील नियंत्रण कक्षातील शाहीर पोलीस निरीक्षक आरती नांदेकर यांची सातारा येथील स्थागुशा अंतर्गत भरोसा सेल येथे बदली झाली आहे