सातारा जिल्हाधिकारी यांची दारू दुकानांना मद्य विक्रीला परवानगी,कंटेनमेंट झोन मध्ये बंदी

परवाना धारक मद्य विक्रेत्यांनी १३ मे २०२० पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपली परवाना धारक मद्य विक्री दुकाने चालू ठेवावीत. उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा. 2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये तसेच महाराष्ट्र बंदी कायदा 1949 व त्या अंतर्गतचे नियमा अन्वये संबंधित दारू दुकानंदारावर गुन्हा दाखल करण्यात येवून संबंधित दारू विक्री परवाना तात्काळ दोन महिन्यांकरीता निलंबित करण्यात याल याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी.

सातारा जिल्हाधिकारी यांची दारू दुकानांना मद्य विक्रीला परवानगी,कंटेनमेंट झोन मध्ये बंदी

जिल्हाधिकारी यांची दारू दुकानांना मद्य विक्रीला परवानगी,कंटेनमेंट झोन मध्ये बंदी

सातारा/प्रतिनिधी

उपरोक्त विषयी सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञपतीधारक विक्री (नमुना .एफएल-2/एफएलबीआर-2/सीएल-3/
एफएलडब्लयू-2/सीएलबीआर-2) यांना याद्वारे कळविण्यात येते की, शासनाने लॉकडाऊन कालावधीमध्ये दारू दुकाने सुरु करुन देण्यास खालील अटींच्या अधीन राहून परवानगी दिलेली आहे.

1. उपरोक्त अनुज्ञप्ती प्रकार पुढील निकषांच्या आधारे चालू करता येतील व सदर अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील. तर शहरी भागात महानगरपालिका हददीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालू करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतत्र (Standalone) किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उकत अनुज्ञपती सुरु करता येतील. अश्या ठिकाणांचीपाहणी करण्यात येवूनच अनुज्ञपती सुरु करुन देण्यास परवानगी देण्यात येईल.

2. सीलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर 25 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फूटांवर वर्तुळ आखून घ्यावीत.

3. अनुज्ञप्तीच्या ठिकाणी ग्राहकांच्या Social Distancing साठी बरैकेटींग व्यवस्था करणे अनुज्ञप्तीधारकावर बंधनकारक राहील.

4. संबंधीत अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकारांची / ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास / ग्राहकास सर्दी,
खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये.

5. दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निजतुकीकरण करणे आवश्यक राहील. तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहाकांसाठी हॅण्ड रब सॅनिटायझर आवश्यक प्रमाणात वारण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधीतअनुज्ञप्तीधारकाची राहील.

6. भारत सरकार, गृह मंत्रालय आदेश क्र. 40-3/2020-डीएम-1(ए), दि. 01 मे, 2020 मधील परिशिष्ट-1 नुसार कामाच्या ठिकाणी पाळण्याची मार्गदर्शक तत्वे किरकोळ विक्रेत्यांना पाठणे आवश्यक राहील.

7. अशा किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुषवळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची असेल.

8. अनुज्ञप्ती मद्यविक्रीसाठी उघडी ठेवण्याचा कालावधी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत.

9. मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70(डी) अन्वये विहित केलेली मद्य बाळणे / खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्यविक्रेत्याने आवश्यक काळजी घ्यावी.

10. कोणत्याही परिस्थीतीमध्ये अनुज्ञप्ती कक्षामधुन /अस्थापने मधुन मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

11. कोणतही अनुज्ञप्तीधारकाने अथवा त्याच्या नोकराने सदर मार्गदर्श तत्त्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान तात्काळ बंद करण्यात येईल व त्यांच्याविरुध्द प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

3. अनुज्ञप्तीधारकाने त्यांच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागत सहजरित्या दिसेल असा फलक लावावा. सदर

फलकावर पुढील तपशील छाण्यात यावा.

अ) दुकानाच्या कामकाजाच्या सुधारीत वेळा

ब) एकावेळी दुकाना समोर 5 पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत.

क) Social Distancing a Mask चा वापर अनिवार्य राहील.

ड) सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. ज्या ग्राहकास सर्दी, खोकला व ताप या सारखी लक्षणे आहेत
व्यक्तींना दुकानात प्रवेश करू नये.

इ) दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही.

फ) थुंकण्यास सक्त मनाई आहे.

ग) दुकानाकहुन्/ग्राहकांकडुन नियमभंग झाल्यास प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई
केली जाईल.

अनुज्ञप्तीधारकांनी खालील बाबींचा अवलंब करावा.

1. कामागारांनी हॅण्डग्लोज व मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2. अनुज्ञप्तीधारकांनी आवश्यकता असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्यावी.
3. कोणत्याही परिस्थितील Social Distancing चे उल्लंघन होणार नाही व गर्दी होणार नाही याची दक्षता
घ्यावी. त्याकरीता 25 ग्राहकांसाठी टोकन सिस्टीम राबवून मदय विक्री करण्यात यावी.
4. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कामगारांना प्रशिक्षित करावे,
5. दुकान सुरु करण्यापूर्वी अनुज्ञप्तीधारक यांनी आराखडा तयार करावा.
6. कंटेनमेंट झोनमध्ये कसल्याही परिस्थितीत दुकान सुरु करुन दिले जाणार नाही.
7. अनुज्ञप्ती सुरु झाल्यानंतर जर भविष्यात एखादे ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले तर
त्याठिकाणचे व्यवहार बंद करण्यात यावेत. त्याबाबत अनुज्ञप्तीधारक यांनी संबंधित प्रांत अधिकारी
यांचेकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन ची माहिती प्राप्त करुन घेण्याची व जर ज्या ठिकाणी कंटेनमेंट प्रोन
जाहीर झाला तर त्यामध्ये संबंधित अनुज्ञप्ती तात्काळ बंद करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित
अनुज्ञप्तीधारक यांची राहील.
8. देशी दारु दुकानामधून फक्त सीलबंद बाटलीचीच विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
अनुज्ञप्तीध्ये ग्राहकांना मद्यसेवन करण्यास देवू नये.
9. कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यविक्री करताना एमआरपीचे उल्लंघन करु नये अन्यथा कठोर कारवाई
करण्यात येईल.