जिल्हा परिषदेच्या 'बाई' झाल्या 'माई'

सौ.विनिता पलंगे यांच्या सुचनेने झाला आमूलाग्र बदल

जिल्हा परिषदेच्या 'बाई' झाल्या 'माई'

जिल्हा परिषदेच्या 'बाई' झाल्या 'माई'

सौ.विनिता पलंगे यांच्या सुचनेने झाला आमूलाग्र बदल

उंब्रज/प्रतिनिधी

महाराष्ट्र सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये महिला शिक्षकांना बाई या नावाने विद्यार्थी व पालक संबोधत असत यामुळे बाई या नावाने हाक मारल्याने महिला शिक्षकांना ते संकोचिंत वाटायचे.सदरची बाब उंब्रज जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.विनिता पलंगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर दि.२२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सातारा जिल्हा मार्फत शिक्षकांना बाई ऐवजी माई संबोधने बाबत आपण महाराष्ट्र शासनामार्फत परिपत्रकाद्वारे शासन निर्णय करावा असा पत्रव्यहवार केला आणि त्याला अपेक्षित यश मिळून सदरचा बदल करण्यात आला.

या पत्रामध्ये सौ.पलंगे यांनी महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक,माध्यमिक शाळा मार्फत सर्व जाती धर्मातील गोरगरीब मुला मुलींना शिक्षण दिले जात आहे.या शिक्षण सेवेसाठी शिक्षक आणि शिक्षिका काम करीत आहेत शिक्षकांना विद्यार्थी गुरुजी नावाने संबोधून सन्मानाने हाक मारत असतात,परंतु शिक्षकांना बाई नावाने संबोधून हाक मारली जात आहे.वास्तविक पाहता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मोलाचे काम गुरुजन वर्ग करत आहेत.शिक्षकांना बाई संबोधने हे आम्हाला संकोचिंत वाटत आहे.असा पत्रव्यवहार सौ.पलंगे यांनी केला होता.

सदर पत्राची योग्य ती दखल घेऊन सूचक सौ.विनिता पलंगे व अनुमोदक सौ.भावना माणिक सोनवलकर यांच्या उपस्थितीत सदरचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकमताने मंजूर झाला यासाठी सौ.विनिता पलंगे याचे जिल्ह्यातील सर्वच महिला शिक्षकांनी आभार मानले आहे.