सहलीच्या बसला तासवडे गावच्या हद्दीत अपघात

वाघोली ता.कोरेगाव येथील शाळा,तीन विद्यार्थी व तीन शिक्षक जखमी

सहलीच्या बसला तासवडे गावच्या हद्दीत अपघात

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एस टी बस व  कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ तसेच एक शिक्षक गंभीर रित्या जखमी झालेत.

जखमींवर कराड व सातारच्या  रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर अपघाताबाबत तळबीड पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अधिकचा तपशील उपलब्ध झाला नाही