पूरगस्तांच्या मदतीपेक्षा सरकार स्व:तच्या ब्रॅडींगमध्ये व्यस्त- शरद पवार

पूरगस्तांच्या मदतीपेक्षा सरकार स्व:तच्या ब्रॅडींगमध्ये व्यस्त- शरद पवार
sharad pavar

 

कराड/प्रतिनिधी :
             वेधशाळेने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा देऊनही सरकारने पाऊस, धरणांमधील पाणीसाठा यांचा ताळमेळ घालणे महत्वाचे होते. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याची खोटी माहिती देऊन प्रत्यक्षात मात्र, तीन-साडेतीन लाखांपर्यंतच विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त फुगवटा वाढल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हे नैसर्गिक संकात्नासून राज्य शासनाच्या बेजबाबदारपणामुळेच ओढवलेले संकट आहे. सर्वसामान्य लोकांना दु:ख्खाच्या खाईत लोटून सरकार स्वतचे ब्रॅडींग करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
           पूरस्थिती पाहणी  दौर्‍याप्रसंगी कराड येथे आले असता आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डॉ. इंद्रजित मोहिते, देवराज पाटील, अविनाश मोहिते आदी. मान्यवर उपस्थित होते.