शेतकऱ्यांची लुट न थांबवल्यास ढोलबजाव आंदोलन

कोरोनामुळे संपूर्ण राज्यातील  शेतीव्यवस्था ढासळली आहे. त्यात शेतीमालालाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अशातच शेतमाल खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती न थांबवल्यास व संघटनेच्या अन्य मागण्या मान्य न केल्यास तहसील कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.

शेतकऱ्यांची लुट न थांबवल्यास ढोलबजाव आंदोलन
प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देताना साजिद मुल्ला व इतर

शेतकऱ्यांची लुट न थांबवल्यास डोलबजाव आंदोलन

बळीराजाचा इशारा : प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन, तालुका स्तरावर हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी :
          कोरोनामुळे संपूर्ण राज्यातील  शेतीव्यवस्था ढासळली आहे. त्यात शेतीमालालाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अशातच शेतमाल खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती न थांबवल्यास व संघटनेच्या अन्य मागण्या मान्य न केल्यास तहसील कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.
         संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सोमवारी 5 रोजी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
         या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना, अतिवृष्टी व शेतमालाला बाजारपेठेचा अभाव आदींमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच शेतकरी कडधान्य व सोयाबीन आदी. शेतमाल बाजारात घेवून गेल्यानंतर व्यापारी वर्गाकडून त्यांची लुट केली जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा माल हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी तालुका पातळीवर ताबडतोब हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावीत
         तसेच सरकारने शेतकऱ्यांचे शेतीपंपासह घरगुती वीज बिल व सर्वप्रकारची कर्जे सरसकट माफ करावीत. त्याचबरोबर दुधालाही प्रती लिटर 10 रुपये अनुदान देऊन ते थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
         त्याचबरोबर या सर्व मागण्या 10 ऑक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास सरकारचे डोळे उघडण्यासाठी सोमवारी 11 रोजी कराड तहसिलदार कार्यालयासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ढोलबजाव आंदोलन करणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.