भाजप पदाधिकाऱ्यांचा शिरवळ येथे सर्जिकल स्ट्राईक

शिरवळ येथे अंदाजे  बेकायदेशीर १३ लाख रुपयांचा सर्जीकल  मेडिकल साहित्याचा  साठा करणार्यांना पोलिस आणी  भाजप पदाधिकार्यांच्या  दणक्याने खळबळ     

भाजप पदाधिकाऱ्यांचा शिरवळ येथे सर्जिकल स्ट्राईक

भाजप पदाधिकाऱ्यांचा शिरवळ येथे सर्जिकल स्ट्राईक

वाई / दौलतराव पिसाळ 

शिरवळ येथे अंदाजे  बेकायदेशीर १३ लाख रुपयांचा सर्जीकल  मेडिकल साहित्याचा  साठा करणार्यांना पोलिस आणी  भाजप पदाधिकार्यांच्या दणक्याने खळबळ     
 
शिरवळ येथील पंढरपूर फाटा येथे असणार्या साई चैतन्य हॉटेलच्या पाठी मागील गोडावुन मध्ये   अंदाजे १३ लाख रुपयांचा  बेकदेशीर पणे असणार्या सर्जीकल मेडिकल साहित्यांच्या व  औषधांच्या साठ्यावर भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सचीव असलेले अनुप सुर्यवंशी यांनी शिरवळ येथील भाजपचे पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन छापा टाकुन दणका दिला असता त्याठिकाणी अंदाजे  १३ लाख रुपये किमतीचे  ५० बॉक्स साठा आढळून आला हा सापडलेला  साठा त्यांनी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिला आहे या कारवाई  मुळे शिरवळ गावात खळबळ ऊडाली आहे.

  
सविस्तर वृत्त असे कि शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीतील पुणे सातारा महामार्गा लगत  असणार्या  पंढरपुर  फाटा येथील     हॉटेल साई चैतन्यच्या पाठी मागील गोडावुन मध्ये रुग्णांन वर ऊपचार करण्या साठी लागणार्या  सिरीज आयवीसेट इंट्राकॅप यांनी  भरलेले १३ लाख रुपये किमतीचे  अंदाजे ५०  बॉक्सचा साठा बेकायदेशीर रित्या ठेवला असल्याची माहिती शिरवळ येथील भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सचीव असलेले अनुप सुर्यवंशी माजी तालुका अध्यक्ष  राहुल हाडके इब्राहिम काझी अजिंक्य कांबळे रोहीत देशमुख मामु  नायकवडी यांना   मिळताच त्यांनी नियोजित   ठिकाणी वरील कार्यकत्यांन सह दि. ९ च्या  संध्याकाळी छापा टाकला   त्या वेळी हा साठा  सापडला याची माहिती अनुप सुर्यवंशी यांनी शिरवळ   पोलिस ठाण्याचे पिएसआय सागर आरगडे यांना मोबाईल वरुन घटनेची माहिती  दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सोबत महिला पिएसआय ॠषाली देसाई सहाय्यक फौजदार  राजु अहेरराव जितेंद्र शिंदे अमोल जगदाळे मदन वरखडे विनोद पवार या  पथकासह घटना स्थळावर दाखल होऊन गेली कित्येत दिवस धुळ खात पडलेल्या या गोडावुन  मधील साठ्याची  पाहणी करुन    बॉक्स उघडुन पाहिले असता त्या मध्ये  रुग्णांन साठी अत्यावश्यक असणारे सिरींज आयवीसेट इंट्राकॅप असे महत्वाचे साहित्य आढळून आल्यामुळे त्या वर कारवाई करण्याचे अधिकार  सातारा येथील फुड ट्रगक्सच्या अधिकार्यांना   असल्याने तो पर्यंत साठा सापडलेल्या गोडावुनला शिरवळ पोलिस अधिकार्यांनी सील ठोकुन त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे  पुढील कारवाई करण्या साठी त्या अधिकारी वर्गांला पाचारण करण्यात  आले आहे या आधिकार्यांचे पथक गुरुवार दि. १० रोजी सकाळी दाखल होणार असल्याची माहिती पिएसआय सागर आरगडे यांनी वाई प्रतिनिधीशी  बोलताना दिली  हा बेवारस असणारा साठा कोरोनो महामारीच्या संकट काळात का वापरण्यात  आणला गेला नाही याचे ऊत्तर सध्या तरी गुलदस्त्यातच आहे पण भाजपच्या या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी केलेल्या या कामाचे शिरवळ ग्रामस्थांनी कौतुक केले आहे