कराड तालुक्यातील 'त्या'गावची पोलीस पाटील निवड वादात

ग्रामसभेच्या ठरावाने झाले 'दूध का दूध',प्रशासनाची चालढकल

कराड तालुक्यातील 'त्या'गावची पोलीस पाटील निवड वादात

अनिल कदम/उंब्रज

शिवडे ता.कराड गावच्या पोलीस पाटलांची निवड वादात सापडली असून याबाबतची तक्रार सातारा जिल्हाधिकारी, कराड प्रांताधिकारी तसेच कराड तहसीलदार यांच्या दप्तरी दाखल झाली आहे.परंतु चौकशीच्या नावाखाली वेळकाढू पणा सुरू असल्याची माहिती तक्रारदार दीक्षित यांनी दै. प्रीतिसंगम बरोबर बोलताना दिली आहे.मी एक महिला असून गेंड्याची कातडी पांघरलेली शासकीय यंत्रणा माझा फुटबॉल करीत असून जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यावर मला कराड प्रांताधिकारी यांच्याकडे  पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला जातो तर प्रांताधिकारी यांनी दिलेली चौकशीची एक महिन्याची वेळ संपून आता दुसरा महिना संपत आला तरी मला मिळत नसल्याने हतबल झाल्याची भावना व्यक्त केली आहे.यामुळे तक्रारदार दीक्षित यांची व्यथा वाचा दै प्रीतिसंगम मध्ये सलग तीन भागात

गरिबाला कोणी वाली नसते याची प्रचिती शिवडे ता.कराड गावच्या पोलीस पाटील पदासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या एका महिला उमेदवाराला आली आहे.परीक्षा दिल्यानंतर काही तासात याबाबत आक्षेप नोंदवील्यांनतर सुद्धा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे एका उमेदवाराला नेमणूक कशाच्या आधारावर दिली याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नक्की कोणकोणत्या व्यक्तींचे हितसंबंध आडवे आले याबाबत उलटसुलट चर्चा असून प्रांताधिकारी कार्यालयातील एकजण समाविष्ट असल्याची चर्चा पसरली असून पोलीस पाटील भरतीत मोठा हात मारल्याचीही चर्चा काहीजण खाजगीत करत असल्याने नक्की पाणी कुठं मुरलंय हे शोधण्याची जबाबदारी प्रांताधिकारी यांच्या शिरावर येऊन ठेपली आहे.शिवडे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असून यामध्ये दोषी असणारे कोण याचा उलगडा लवकरच प्रीतिसंगमच्या माध्यमातून होईल.

 


(सविस्तर सलग तीन भागात वाचा दै प्रीतिसंगम मध्ये गुरुवार ते शनिवारच्या अंकात)