'शिवस्नेह' ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करेल - श्रीमती प्रमिला केणी

'शिवस्नेह निधी लिमिटेड' या संस्थेच्या माध्यमातून अनेक ग्राहक, छोटे-मोठे व्यावसायिक व नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध होणार असून 'शिवस्नेह' अल्पावधीतच ग्राहकांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण करेल.

'शिवस्नेह' ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करेल - श्रीमती प्रमिला केणी
कळवा : शिवस्नेह निधी लिमिटेड या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना नगरसेविका श्रीमती प्रमिला केणी. सोबत, मंदार केणी, चेअरमन सौ. स्नेहल सावंत, व्हाईस चेअरमन श्री. अशोक सावंत, संस्थापक श्री. तेजस सावंत, सचिव श्री. अजित पवार व मान्यवर.

'शिवस्नेह' ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करेल 

श्रीमती प्रमिला केणी : शिवस्नेह निधी लिमिटेड संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न 

ठाणे/प्रतिनिधी : 

         गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'शिवस्नेह निधी लिमिटेड' या संस्थेचे उद्घाटन होत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक ग्राहक, छोटे-मोठे व्यावसायिक व नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध होणार असून 'शिवस्नेह' अल्पावधीतच ग्राहकांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण करेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका श्रीमती प्रमिला केणी यांनी केले. 

         कळवा (पश्चिम) ठाणे येथे शनिवारी 2 रोजी सकाळी श्रीमती प्रमिला केणी यांच्या हस्ते 'शिवस्नेह निधी लिमिटेड, The Bank That Helps You या संस्थेच्या  कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. 

         यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मंदार केणी, शिवस्नेहच्या चेअरमन सौ. स्नेहल अशोक सावंत, व्हाईस चेअरमन श्री. ओमकार अशोक सावंत, संस्थापक श्री. तेजस गणपत सावंत व सचिव श्री. अजित हनुमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

         श्रीमती केणी म्हणाल्या, सध्याचे युग हे नव उद्योजकांचे युग आहे. परंतु, गत दोन वर्षामध्ये कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. या काळात खाजगी क्षेत्रातील हजारो युवकांच्या नोकर्‍या गेल्या. तर अनेकांचे उद्योग, व्यवसायही अडचणीत आले. त्याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र, आता हळूहळू या परिस्थितीत सुधारणा होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या काळात लोकांना पुन्हा एक नवी सुरुवात करण्यासाठी आर्थिक हाताभाराची अत्यंत गरज आहे. अशा अनेक ग्राहकांसह छोटे-मोठे व्यवसायिक व नव उद्योजकांनाही 'शिवस्नेह निधी लिमिटेड' ही संस्था नक्कीच कर्जरूपी मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम बनवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

         दरम्यान, शॉप नंबर 1, श्री सिद्धिविनायक टॉवर, आई नगर, कळवा पोस्ट ऑफिस जवळ, कळवा (पश्चिम) ठाणे 400605 याठिकाणी 'शिवस्नेह निधी लिमिटेड' या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला असून ग्राहकांनी या फर्मच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संस्थापक व सचिव यांनी केले. 

शिवस्नेह'चा स्नेह वृद्धिंगत होईल 

'शिवस्नेह निधी लिमिटेड, The Bank That Helps You या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बँकिंग क्षेत्रात एक नवे पाऊल टाकले आहेत. या संस्थेद्वारे आम्ही नक्कीच आमचे ग्राहक, छोटे-मोठे अनेक व्यवसायिक व नव उद्योजकांनाही अर्थसहाय्य करणार असून अल्पावधीतच 'शिवस्नेह' सोबत ग्राहकांचाही स्नेह वृद्धिंगत होईल. 

- श्री. अजित पवार (सचिव, शिवस्नेह निधी लिमिटेड)