अक्कलकोट चे आयुर्वेदिक हकीम गवंडी यांनी कोरोना वर औषध शोधल्याचा केला दावा

अक्कलकोट चे आयुर्वेदिक हकीम गवंडी यांनी कोरोना वर औषध शोधल्याचा केला दावा

अक्कलकोट/ महेश गायकवाड

अक्कलकोट येथील सुप्रसिद्ध आणि जुने असलेले हकीम मल्लिकार्जुन रेवनसिध्द गवंडी यांनी आपण कोरोना च्या साथी वर औषध शोधल्याचा दावा केला असून हे औषध घेतल्यावर केवळ पाच दिवसांत माणूस कोरोना च्या आजारातून बरा होतो असा ही दावा त्यांनी केला आहे हे औषध जन्मलेल्या बाळा पासून ते वयोवृद्ध व्यक्तींना ही चालते असे सांगून हकीम गवंडी पुढे म्हणाले की हे माझ्या या औषधांची सरकारने सत्यता पडताळून पहावे जर गुण नाही आला तर औषध रद्द करावे असेही त्यांनी म्हंटले आहे.

औषध सरकारने  वापरणे सुरू करावे म्हणून आपण मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे आणि सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. हे औषध आपण मोफत देणार आहोत केवळ जनतेला याचा फायदा झाला पाहिजे जनता कोरोनाच्या रोगातून बरी झाली पाहिजे एवढे च आपले उद्दीष्ट असल्याचे ही हकीम गवंडी यांनी सांगितले, त्यासाठी आपण जनतेकडून एक रुपया देखील घेणार नाही लोकांनी स्वतःहून दिले तरीही आपण एक रुपया देखील घेणार नाही असे ही त्यानी सांगितले आहे त्यांच्या औषधाची सत्यता पडताळून कोरोनाच्या रोगावर हे औषध चालू करावे अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील जनतेतून केली जात आहे. 
महाराष्ट्र सरकार आणि सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना पाठविलेले पत्र या ठिकाणी देत आहोत.
मा. मुख्यमंत्री
उद्धव जी ठाकरे साहेब  तसेच 
जिल्हाधिकारी  साहेब सोलापूर 

*मी मल्लिकार्जुन रेवणसिद्ध गवंडी रा.अक्कलकोट (सोलापूर) अनुभवी आयुर्वेदिक हकीम (अनुभव २० वर्ष)* महोदय मी सध्याचा कोरोना रोगाच लक्षण बघून औषध तयार केली आहे तरी त्या संधर्भात आपणास भेटायचं आहे तरी मला आपणास भेटण्यासाठी फक्त दोन मी. वेळ मिळावी ही नम्र विनंती व माझे औषध कॉरोना बाधित रुग्णावर फक्तं दोन तासात गुण येण्यास सुरुवात होतो व पाच दिवसातच रुग्ण पूर्ण बरा होतो असं माझ खात्री आहे याचं संधर्भात आपणास भेटण्यासाठी फक्त दोन मी. वेळ मिळावी ही नम्र विनंती आणि हेच औषध पूर्ण भारतातील सर्व रुग्णांना माझी विना मोबदला द्यायची तयारी आहे 
संपर्क नंबर
१)9881784930
२)8208449816 
व्हॉट्स ऍप नंबर.