सोलापुरात नर्सच्या पतीला मारहाण करून त्यांच्या गाड्या जाळल्या

सोलापूर शहरात एका नर्ससोबत धक्कादायक प्रकार घडला आहे, गर्दी करू नका अंतर ठेवून थांबा असे सांगितले म्हणून त्या नर्सच्या पतीला मारहाण करून त्यांच्या थेट गाड्या जाळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार काल रात्री उशिरा येथील विडी घरकुल परिसरात घडला आहे. मार्कनंडेय रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स सोबत हा प्रकार काल रात्री घडला आहे. यामुळे सोलापूर शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापुरात नर्सच्या पतीला मारहाण करून त्यांच्या गाड्या जाळल्या

सोलापूर/महेश गायकवाड
सोलापूर शहरात एका नर्ससोबत धक्कादायक प्रकार घडला आहे, गर्दी करू नका अंतर ठेवून थांबा असे सांगितले म्हणून त्या नर्सच्या पतीला मारहाण करून त्यांच्या थेट गाड्या जाळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार काल रात्री उशिरा येथील विडी घरकुल परिसरात घडला आहे. मार्कनंडेय रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स सोबत हा प्रकार काल रात्री घडला आहे.  
यामुळे सोलापूर शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
 सोलापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांना गर्दी करू नका असं सांगणं एका नर्सच्या चांगले च अंगलट आले आहे. लोकांना गर्दी करू नका थोडे अंतर ठेवून उभे राहा.असे  सांगणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीची जमावाने थेट गाडीच पेटवून दिल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील विडी घरकूल इथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या संबंधी तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांकडूनही टाळाटाळ केल्याचं समोर आलं आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका असे सांगणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीची गाडी जमावाने जाळली. 'तूच रुग्णालयात जातेस, तुझ्यामुळेच कोरोना आमच्याकडे येईल' म्हणून टोळक्याने नर्सला धमकी दिली होती. धमकीनंतर काल रात्री गाड्या जाळल्याचा आरोप महिलेने केला आहे.
दरम्यान, पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. खरंतर, कोरोनामुळे देशाला एका वेगळ्याच उंबरठ्यावर आणून उभं केलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी लोकांना एकत्र येत सामना करावा लागणार आहे. पण त्यासाठी अशी माणूसकी सोडून चालणार नाही. स्वत:च्या जीवाची परवा न करता अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी लोक रोज काम करत आहेत. त्यांच्याकडे कोरोनाबाधित असल्याच्या नजरेने पाहणे अतिशय चुकीचं आहे.