विजापूरसह इंडी अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के

विजापूरसह इंडी अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के

सोलापूर - महेश गायकवाड

 

शनिवार दि.९ रोजी सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये  तसेच विजापूर जिल्ह्यातील इंडी आणि अक्कलकोट तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात भूकंपाचे  सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

 

सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या  कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात भूकंपाचा  केंद्रबिंदू आहे.  उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची खात्रीशीर   माहिती मिळाली आहे. दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा नुकसान झालेले नसल्याची माहिती आहे.तसेच सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झाले याची अद्याप संपुर्ण माहिती मिळालेली नाही.

आज सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुरुवातीला नेमके काय झाले हे लोकांना कळले नाही, पण गडबड जाणवली होती. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती लोकांना मिळाली. सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील आलमट्टी धरण परिसर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.  अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील लोकांना सौम्य धक्के लागल्याची माहिती त्यांनी माहिती दिली. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडले  आहे का ? याची चौकशी केली जात आहे. राज्यात मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे.

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अद्याप नुकसान झालेले नाही. परंतु सकाळी भूकंप झाल्यानंतर काही दुर्घटना घडली आहे का ? याची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान विजापूर जिल्ह्यात हा  भूकंप सकाळी सहाच्या सुमारास झाला. त्यांची तीव्रता केवळ 4.4 रिस्टर स्केल इतकी होती, विजापूर मध्ये कोणतीही पडझड झाली नाही.  सोलापूर शहर हे विजापूर पासून लांब आहे, त्यामूळे सोलापुरात घाबरण्याचे  कारण नाही असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रशासनाने अद्याप भूकंप झाला आहे हे अधिकृत जाहीर केले नसले तरी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका  तसेच विजापूर जिल्ह्यातील  इंडी तालुका  दक्षिण सोलापूर  उत्तर सोलापूर तालुक्यातील काही  काही भाग मंगळवेढा चा काही भाग या ठिकाणी भूकंपा चे धक्के जाणवले आहेत,
 
शेगांव येथे सकाळी ६.२२ वाजता भुकंप झाल्याची माहिती मिळाली तर मुंडेवाडी येथे ही सौम्य धक्के बसल्या वर काहीसा आवाज आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे  सोलापूर शहराच्या विजापूर रोड भागातील रामवाडी परिसरात सहा वाजून बावीस मिनिटाला भूकंप झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.अक्कलकोट तालुक्यातील आळगी  येथे अतिशय सौम्य धक्के जाणवले आहेत.कलकर्जाळ परीसरात ही आवाज आल आहे,असे नागरिकांनी सांगितले.खानापूर ,जवळगी, अंकलगे तसेच भिमा नदी पात्रा च्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये आणि विजापूर जिल्ह्यात तसेच इंडी तालुक्यात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे समजत आहे.