हवालदार महादेव राठोड यांचा कोरोना महामारीने मृत्यु

हवालदार महादेव राठोड यांचा कोरोना महामारीने मृत्यु

सोलापूर/प्रतिनिधी
 
सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार महादेव राठोड यांचा कोरोनाच्या आजाराने आज निधन झाले,
सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले महादु राठोड (वय ४४) यांना काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती त्यांच्या वर कोविड रुग्णालयात उपचार ही सुरू होते,

शुक्रवारी सकाळी कोरोना च्या साथीने निधन झाले. पोलीस हवालदार म्हणून ते सद्या  एम आय डि सी, पोलिस  ठाणे  सोलापूर येथे  नेमणूकी वर होते,आज सकाळी त्यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.  आजाराने मरण पावले, राठोड हे  सोलापूर पोलीस दलात असतांना विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य पार पाडले होते, या पूर्वी   अशोक चौकी तसेच सदर बझार पोलीस ठाण्यात ही काम पाहिले.हवालदार राठोड हे देगाव (ता दक्षिण सोलापूर) जवळील बसवेश्वर तांडा येथील रहिवाशी होते. कोरोना महामारीत ही ते ड्युटी वर कार्यरत होते, परंतु त्यांना कोरोनाची अचानक लागण झाली होती,
सोलापूर पोलीस दलातील दुसऱ्या पोलीसांचा आज मृत्यू झाला आहे, या पुर्वी ही याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराचा मृत्यु झाला होता.