बोरामणी  दरोड्यातील सर्व आरोपींना अटक  

■ऊस तोड कामगारांनी रेखी करून सोलापूर जिल्ह्यात टाकले दरोडे ■ 'अजय देवगण' नावाच्या आरोपीने केला दरोडा टाकून जाताना  खुन

बोरामणी  दरोड्यातील सर्व आरोपींना अटक  

बोरामणी  दरोड्यातील सर्व आरोपींना अटक  

■ऊस तोड कामगारांनी रेखी करून सोलापूर जिल्ह्यात टाकले दरोडे
■ 'अजय देवगण' नावाच्या आरोपीने केला दरोडा टाकून जाताना  खुन

   महेश गायकवाड/सोलापूर-


दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात दरोडेखोरांनी दरोडा घालून एका वृद्ध व्यक्तीचा खून केला होता. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला होता. दिनांक 9 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 396 व 397 नुसार गुन्हा दाखल झाला होता.दरोडेखोरांनी दरोडा घालताना विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला देखील केला होता.यामध्ये बाबुराव सोमनाथ हिरजे (वय 70 वर्ष,रा हिरजे वस्ती, बोरामणी, दक्षिण सोलापूर) यांचा मृत्यू झाला होता. तर सुलोचना बाबुराव हिरजे (वय 65 वर्ष) यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेऊन गेले होते.  ग्रामीण पोलीस दलाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  याचा सखोल तपास करत , सहा संशयीत आरोपींना आज रविवारी दिनांक 20 मार्च रोजी अटक केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व दरोडेखोर ऊसतोड कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. हाती काहीही लागले नाही मग रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून या दरोडेखोरांनी वृद्ध इसमाचा जाता जाता खुन केला होता.

● ऊसतोड दरोडेखोरांनी रेखी करून दरोडा घातला होता-
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊसतोड कामगारांनी बोरामणी शिवारात येऊन  विविध शेतात ऊसतोडचे काम करून रेखी केली होती. दीडते दोन महिन्यांपूर्वी सर्व संशयीत दरोडेखोर सोलापुरात उसतोड मजूर म्हणून आले होते.9 मार्च रोजी उस्मानाबाद येथून एका चार चाकी वाहनातून सोलापुरातील बोरामणी येथे आले आणि सुरुवातीला पाटील वस्ती येथे दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.पाटील वस्ती येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आणि दरोडेखोर तेथून पळाले.आजूबाजूला असलेल्या शेतात लपून बसले होते.

●रिकाम्या हाती परत ना जाण्याचं बेतात त्यांनी खून केला-
 एवढं खर्च करून आलो आहे,रिकाम्या हाती परत न जाण्याचा दरोडेखोरांनी निर्णय केला होता. सर्व आठ दरोडेखोरांनी आपला मोर्चा हिरजे वस्तीकडे वळविला.हिरजे वस्ती येथे सुलोचना हिरजे आणि बाबुराव हिरजे हे दोघे गाढ झोपेत झोपले होते.त्यांच्या घरावर गेले असता बाबुराव हे झोपेतून उठले आणि दरोडेखोरांना विरोध केला,दरोडेखोरांनी बाबुराव यांवरघातक शस्त्रांनी हल्ला केला,आणि ठार केले.सुलोचना हिरजे यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले होते.सुलोचना या वृद्ध महिलेला देखील जबर मारहाण .

●तब्बल सात दिवसांचा अथक प्रयत्नानंतर दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या-
घटना घडल्या नंतर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली होती.आठ दिवस अथक प्रयत्नानंतर स्थानिक गुन्हे शाखेला सुगावा लागला.स्केचच्या आधारावर आजूबाजूच्या दोन जिल्ह्यात तपास लागला.पोलिसांनी वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे(वय 22 वर्ष,रा फकराबाद,जि अहमदनगर),संतोष झोडगे(वय 20 वर्ष,रा डोकेवाडी,ता.भूम जि उस्मानाबाद),अजयदेवगण उर्फ देवगण शिंदे(वय 22 वर्ष,रा शेळगाव,ता परांडा,जि उस्मानाबाद),ज्ञानेश्वर लिंगु काळे(वय 19,वर्ष,रा पांढरेवाडी,ता परांडा,जि उस्मानाबाद),सुनील उर्फ गुल्या शिंदे(वय 23 वर्ष,रा शेळगाव,ता परांडा,जि उस्मानाबाद),विकास नागेश भोसले(वय 30 वर्ष,रा डोकेवाडी,ता भूम,जि उस्मानाबाद) यांना अटक केले आहे.अक्षय काळे(रा पिंपळगाव ता जामखेड,जि उस्मानाबाद),अनुज उर्फ भैय्या नागनाथ भोसले(रा.डोकेवाडी,ता भूम,जि उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

●स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करून दरोड्याचा उकल केला आहे.
बोरामणी दरोड्याचा तपास लावण्यात मुख्य भूमिका स्थानिक गुन्हे शाखेची आहे.यामध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,उपअधीक्षक अमोल भारती,पोलीस निरीक्षक सुहास जगताप,अरुण फुगे,एपीआय धनंजय मोरे,रवींद्र मांजरे,अतुल भोसले,अंकुश माने,सत्यजित आवटे,नागनाथ खुणे,प्रवीण सापांगे,पीएसआय शैलेश खेडकर,सुरज निंबाळकर,ख्वाजा मुजावर,राजेश गायकवाड,श्रीकांत गायकवाड,नारायण गोलेकर,प्रकाश कार्टकर,धनाजी गाडे,बापू शिंदे,सलीम बागवान,आबा मुंडे,मोहन मनसावले,विजयकुमार भरले,हरिदास पांढरे,रवी माने,दया हेमबाडे,अमोल माने,गोसावी बारगिर,लाला राठोड,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,अजय वाघमारे,नितीन चव्हाण,पांढुरंग काटे,सचिन गायकवाड,व्यंकटेश मोरे,अनवर अत्तार,रतन जाधव,देवा सोनलकर,प्रमोद माने,रामनाथ बोंबीलवार,केशव पवार,समीर शेख आदींनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी मेहनत घेतली.